Link copied!
Sign in / Sign up
8
Shares

असे करा रव्याचे मोदक

असे करा रव्याचे मोदक 

साहित्य

२ वाट्या बारीक रवा

१ वाटी पाणी, दिड वाटी साखर

१/२ वाटी साजूक तूप

१ लहान चमचा वेलची पूड

बदाम काप

खाण्याचा केशरी रंग

कृती 

प्रथम रवा मध्यम आचेवर तूपावर भाजून घ्यावा. खमंग वास आला कि गॅसवरून उतरवावा.

कढईत साखर आणि पाणी एकत्र करून एकतारी पाक करून घ्यावा. [साखर वितळली आणि पाण्याला उकळी फुटली कि ३ ते ४ मिनिटात एकतरी पाक तयार होतो.]

भाजलेल्या रव्यात पाक ओतावा. गुठळ्या न होता मिक्स करावे. त्यात वेलची पूड घालावी.खाण्याचा केशरी रंग घालावा.

हे रव्याचे आणि साखरेचे मिश्रण झाकून ठेवावे. तासाभरात मिश्रण आळते.

मग मोदक साच्याला तूपाचा हात लावुन त्यात रव्याचे सारण भरून मोदकाचा आकार द्यावा.

बदाम काप घालून सजावट करावी.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon