Link copied!
Sign in / Sign up
13
Shares

या सात गोष्टींमुळे तुमच्या वैवाहिक नाते तुटू शकते

प्रत्येक विवाह विश्वास आणि प्रेमाच्या भक्कम पायावर उभा असतो. तुमचा जोडीदार तुमचा सोलमेट आहे की, नाही? ​ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तींपैकी एक असतो. ​ज्या क्षणी तुम्ही लग्नाची गाठ बांधता ​तेव्हा तुम्ही सर्वस्वी त्याच्या आणि तो तुमचे सर्वस्व असतो. ही खूप मोठी जबाबदारी असते ज्याचे तुम्हाला थोडे दडपण येऊ शकते. तुमचा विवाह कुठल्याही दडपणाखाली तर नाही ना याची खात्री करण्यासाठी ​या गोष्टी जरूर टाळाव्यात​.

१. शब्दांचा वापर शस्त्र म्हणून करू नका 

 एखादी क्रिया शब्दातून व्यक्त होते, तुमच्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द शस्त्रासारखा असतो जो परत घेता येत नाही.​ ​अर्थात अशी परिस्थिती असेल जिथे तुम्ही दोघेच असाल तिथे स्वतः:साठी बोलू शकता. परंतु तुम्ही बोलताना शब्द जपून निवडा. उदा. तुमच्या ​पतीने तुम्हाला काही तरी करण्याचे कबुल केले असेल परंतु काही कारणास्तव तो ते वचन पूर्ण करू शकत नसेल तर तुम्ही एक पत्नी म्हणून लगेच ''तू माझ्याचसाठी काहीच करत नाहीस,''या वक्तव्यामु​ळे तुमचे पती दुखावले जाण्याची शक्यता असते. तुम्ही लगेच असे काही बोलाल असे त्याला अपेक्षितच नसते.

२. चारचौघात सतत चुका काढणे 

कोणालाही सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर स्वतः:चा अपमान किंवा लज्जयास्पद वागलेले आवडत नाही. आपल्या घरातल्या गोष्टी चारचौघात पसरू नये. तुमच्या दोघांतला थोडासा वाद जरी बाहेरच्यांना समजला तरी त्यावरून विविध गॉसिप बाहेर पडते, ज्याचा परिणाम दोघांच्या नात्यावर होऊ शकतो. जर तुम्ही तुमच्या पतीशी सहमत नसाल तर चारचौघात त्याला नाराज किंवा त्याच्या निर्णयावर टीका करू नका. हा त्याच्या अहंकाराला पोहोचलेला सर्वात मोठा धक्का असतो आणि त्याची किंमत नंतर आपल्याला मोजावी लागते.

३. त्याच्या आधिकारांकडे दुर्लक्ष 

घरातील करता पुरुष म्हणून भूमिका निभावणे खूप अवघड गोष्ट आहे. ही भूमिका म्हणजे अतिशय जबाबदारीची असून प्रत्येक प्राप्त परिस्थितीत त्याला कठीण असे निर्णय घेयला लागू शकतात. अशा परिस्थितीत त्याच्याशी बोला,​ ​संवाद सोडविण्यासाठी प्रयत्न करा. प्रत्येकवेळी त्याने घेतलेला निर्णय कसा चुकीचा आहे दाखवून देऊ नका.​ ​जर तुम्हाला माहीत आहे त्याने घेतलेला निर्णय ​बरोबर नाही, तर तो सांगण्यापूर्वीच त्याची मदत करायला,​ ​संबंधित काम करायला सुरवात करा.

४.दोन्हीं बाजूने बोलणे 

भारतात विशेषत महिला बऱ्याचदा द्विअर्थी बोलताना दिसतात. परंतु तुम्हाला हे माहीत आहे का? हे दोन्ही प्रकारे चालते. कल्पना करा की, तुमच्या पतीने ​तुम्हाला घरकामात मदत करावी ​असे वाटते.​ पण जेव्हा तो तुम्हाला सांगतो की, ​प्लम्बरला किंवा इलेक्ट्रि​शियनला फोन करून बोलवून घे, तेव्हा त्यांना लगेच "हे मी का करू, हे माझे काम नाही पुरुषांचे काम आहे" असे उत्तर देणे योग्य नाही. जर का एखादे काम करणे पसंत नसेल तर तुम्ही तुमच्या पतीला तसे सांगा आणि तसेच तुम्ही सुद्धा दरवेळी तुम्ही सांगितलेले काम त्यांनी केलेच पाहिजे असा आग्रह धरणे देखील चुकीचे आहे.

५. त्याला बदलण्याचा प्रयत्न करत आहात ​का? ​

जेव्हा कोणी सारख्याच चारचौघात आपल्या चुका काढत असते तेव्हा आपल्या अधिक दुखावल्या सारखे होते, तर एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व 'बदलण्याचा प्रयत्न करत असाल तर किती धक्कादायक असेल! एखाद्या व्यक्तीचे प्रत्येकवेळी थोडेसे एडजेस्ट करणे त्याला / तिचे सर्वांपेक्षा वेगळेपण आणि सुंदर बनवते.​ अशा लहान गोष्टींवर टीका करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, त्या व्यक्तीला आलिंगन द्या आणि आपण त्याहून चांगले व्हाल.

६. त्याच्यावर सारखे ओरडणे 

'जोडीदार आनंदी असेल तर घर आनंदी राहते'. हे सूत्र प्रत्येक विवाहित व्यक्तीने लक्षात ठेवले पाहिजे. ​यासाठी तुम्हाला ​खूप काही जगावेगळे करायची गरज नसते, आपल्या जोडीदाराला आनंदी ठेवण्याचा मार्ग ताच्या पोटातून ​जातो, एखाद्या दिवशी त्याच्या आवडीची डिश बनवा आणि त्याला सरप्राईज द्या​ ​​आणि ​पतीने आपल्या पत्नीला जायचे आहे त्या ठिकाणची ट्रिप ठरवा. आनंदी पतीसाठी आणखी काही नाही केलेत तरी चालेल फक्त सतत त्यावर टीका ​किंवा ओरडाआरडी ​अजिबात करू नका. आपण ही एक माणूस आहोत आपल्याला राग येतो, चिडतो, पण त्यावर योग्य नियंत्रण असलेच पाहिजे. रागाने फक्त सगळ्या गोष्टी बिघडतात. शांत राहणे, शांततेने मार्ग काढणे हीच आजच्या युगातील एक कला आणि आरोग्याची गुरूकिल्ली आहे.

७.  फसवणूक 

जोडीदाराने दुसऱ्या व्यक्तीसोबत शाररिक संबंध ठेवणे तसेच त्यापेक्षा ही मो​ठी फसवणूक म्हणजे मानसिक असते. यामुळे विवाह निश्चितच मोडतो. जर तुम्ही आपणहूनच जोडीदारापासून दूर जात आहात तर इतर कोणावरही सांत्वन, प्रेम करु नये. जरी आपण आपल्या मनात असा विचार आणला तरी तो आपल्या नातेसंबंधाला हानी पोहचवू शकते.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon