Link copied!
Sign in / Sign up
14
Shares

ब्रेडच्या पाककृती भाग १

वास्तविक ब्रेड ही ब्रिटिशांची देणगी आहे कारण त्यांच्या राजवटीत ब्रेड भारतात आला. त्या काळी ब्रेड खाल्ला तो बाटला असे म्हटले जायचे. त्यामुळे अनेक वर्ष ब्रेड निषिद्ध होता. मात्र आता ब्रेड हा रोजचा आहार झाला आहे. बहुतेकदा न्याहारीला ब्रेड खाण्याचा रिवाज भारतात पडला आहे. काही घरांमध्ये अगदी रोज खाल्ला नाही तरीही तो व्यर्ज असतो असे बिलकुल नाही. आठवड्यातून एकदा ब्रेड खाल्ला जातो. अर्थात नुसता ब्रेड खाणे हे देखील कंटाळवाणे ठरते. वास्तविक ब्रेड हा अत्यंत लवचिक म्हणजे पदार्थांबरोबर, पदार्थात घालून किंवा स्वतंत्र अस्तित्व ठेवून किंवा विविध प्रकार करून खाता येतो. बच्चे कंपनीला तर ब्रेड आत्यंतिक आवडतो.

हल्ली ब्रेडचे गव्हाचा ब्रेड म्हणजेच ब्राऊन ब्रेड किंवा पांढरा ब्रेड किंवा सँडविच ब्रेड, तसेच गोड ब्रेड ज्यात टुटीफ्रुटी घातलेली असते असाही ब्रेड मिळतो. अनेक बेकèया विविध प्रकारचे ब्रेड तयार करत असतात.

मुलांना न्याहारीसाठी म्हणून देताना दूध ब्रेड, लोणी साख़र ब्रेड, जॅम ब्रेड आवडतो काही जण तर सॉस ब्रेडही खातात. पण तरीही मुले काय मोठे काय रोज ब्रेड खाऊन कंटाळतातच. मगाशी म्हटले तसे ब्रेड अत्यंत लवचिक पदार्थ असल्याने त्याचा वापर करुन विविध पाककृती नक्कीच करता येतात.

विविध पाककृती

ब्रेड पकोडा

हा प्रकार अत्यंत लोकप्रिय आहे. तसेच तुलनेने कमी वेळात तयार होतो. यामध्ये ब्रेडमध्ये स्टफ केले पाहिजेच असे नाही. ब्रेडचे चौकोनी किंवा त्रिकोणी तुकडे करा. बेसनात मीठ आणि तिखट टाकून त्याचे भज्यांसारखे पीठ करून घ्या. कढईत तेल तापत ठेवा. आता ब्रेडचे तुकचे बेसनाच्या पीठात बुडवून तळावेत. सॉसबरोबर खायला द्यावेत.

ब्रेड पकोडा २ रा प्रकार-

वरील प्रमाणे तयारी करावी. मात्र ब्रेड मध्ये सँडवीच सारखी भाजी भरावी. त्यासाठी बटाटे उकडून ते स्मॅश करून त्यात मीठ, मिरची कोqथबीर, हळद घालावी. वाटल्यास भाजी परतून घेतली तरीही चालते. बटाट्याचे हे सारण एका ब्रेडवर ठेवून त्यावर दुसरा ब्रेड ठेवावा. त्याच्या कडा बंद करून तो बेसनपीठात बुडवून वरील प्रमाणे पकोडे तळावेत. यात फक्त बटाट्याचे सारण असेही नाही. त्यात थोड्या वेगळ्या भाज्याही घालू शकता.

ब्रेड उपमा

ब्रेडचा उपमा झटपट आणि चटपटीत असा प्रकार आहे. मात्र त्यासाठी अगदी ताजा ब्रेड वापरणे टाळावे. एक दिवसापुर्वीचा ब्रेड वापरल्यास अधिक उत्तम. ब्रेडचे छोटे छोटे चौकोनी तुकडे करावेत. कढईत थोडे जास्त तेल गरम करावे. त्यात मोहरी, जिरे, हिंग कढीपत्ता, हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकून फोडणी करावी. त्यात हे तुकडे टाकून छान परतून घ्यावेत. मग गॅस बंद करून कोथिंबीर भुरभुरावी आणि खायला द्यावे.

सँडवीच

हा सर्वांचाच प्रिय प्रकार आहे. त्यासाठी काकडी, टोमॅटो,कांदा, बीट, उकडलेला बटाटा यापैकी दोन तीन जिन्नस घेऊन त्याचे काप करावेत. आता एका ब्रेडला लोणी लावावे, दुसèया ब्रेडला पुदीना चटणी किंवा सॉस लावावे. आता लोणी लावलेल्या ब्रेडवर काकडी, टोमॅटो आणि कांदा, बटाटा किंवा आपल्या आवडीनुसार भाज्यांचे काप घालावेत. त्यावर हवे असल्यास चीझ किसून टाकावे. आणि मग दुसरा ब्रेड त्यावर ठेवावा. सँडवीच तयार. चीज ऐवजी मेयोनीज घालता येऊ शकते. 

ब्रेड बटाटा रोल

बटाटा उकडून तो तिखट, मीठ, चाट मसाला घालून त्याची भाजी किंवा सारण तयार करून घ्यावे. ब्रेडच्या कडा काढून टाकून तो पाण्यात बुडवून त्यातील पाणी काढून टाकावे. आता ब्रेडमध्ये बटाट्याच्या सारणाचे गोळे भरावे त्याचा रोल करावा. नॉनस्टिक पॅन मध्ये तळून घ्यावेत. सॉस किंवा पुदीना चिंच चटणी बरोबर द्यावेत.

ब्रेडचा शिरा

हा जरा वेगळा प्रकार करुन पाहता येईल. सर्वसाधारणपणे गोड खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण नाही. शिरा हा बहुतांश प्रत्येकाच्या घरी तयार होतो. ब्रेडचाही शिरा तयार करता येतो. एका कढईत तुप टाकून ब्रेडचे तुकडे परतवून घ्यावेत. मग त्यात दूध आणि गुळ घालून ते परतवून घ्यावेत. हे मिश्रण सतत ढवळत रहावे. जेव्हा मिश्रण आळेल किंवा घट्ट होईल तेव्हा त्यात वेलदोड्याची पूड, काजू आणि बदाम टाकून मिसळून घ्यावेत. ब्रेडचा शिरा तयार आहे.

 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon