Link copied!
Sign in / Sign up
21
Shares

बाळाच्या आहारनुसार त्याला होणाऱ्या शी मधील बदल

१. नवजात बाळाला होणारी शी 

जन्म झाल्यानंतर पहिले २ दिवस तुमचे बाल मिकोनियम म्हणजेच हिरव्या रंगाची शी करेल. यात म्युकस, गर्भाशयातील द्रव म्हणजेच अॅम्निअॉटीक फ्ल्यूड आणि ते सर्व काही असेल जे बाळाने तुमच्या गर्भात असतांना त्याच्या पोटात गेले होते.

मिकोनियम हा हिरव्या- काळ्या रंगाचा चिकट पदार्थ असतो. याच्या चिकटपणामुले कदाचित तो पुसतांना तुम्हाला अवघड जाईल परंतु जर मिकोनियम असेल तर तुमच्या बाळाची पचनसंस्था चांगले काम करत आहे याची ही खुण आहे.

२. स्तनपान देत असताना.

आईचे दुध बाळासाठी अगदी उत्तम असते. पहिले दुध बाळाच्या पचनसंस्थेत सारखे काम करते. ज्यामुळे मिकोनीयम बाहेर ढकलण्यास मदत होते. आईचे दुध सुरु केल्यानंतर जवळपास ३ दिवसांनी बाळाच्या शी च्या टेक्सचर मध्ये हळू हळू फरक पडतो.

हा फरक पडतांना शी आधी हलक्या रंगाची असेल, हा रंग बदलून नंतर हिरवट- काळा होईल आणि नंतर गडद पिवळसर रंगात बदलेल. ही पिवळसर शी थोडीशी गोड वासाची असेल. ही शी पातळ असेल आणि कधी कधी यात बारीक बारीक दाणे असू शकतात किंवा गुठळे असतात.

सुरवातीच्या आठवड्यात तुमचे बाळ कदाचित प्रत्येक वेळी जेवण झाल्यावर आणि जेवणाआधी शी करेल. पहिल्या आठवड्यात दिवसातून ४ वेळा नॅपकीन बदलण्याची वेळ देखील तुमच्यावर येऊ शकते. बाळाची पचनसंस्था योग्य रुळावर आल्यानंतर हे कमी होईल. तुमच्या लक्षात येईल कि बाळाची शी करण्याची रोजची एक नियमित वेळ आहे.

३. फॉर्म्युला मिल्क देत असतांना.

फॉर्म्युला मिल्क पचनासाठी आईच्या दुधाएवढे प्रभावी नसते. हे दुध देत असतांना बाळाची शी जरा घट्ट असेल. या शी चे टेक्सचर टूथपेस्ट सारखे जड असेल. हे दुध पचायला सोपे नसल्यामुळे बाळ सतत शी करणार नाही. ही शी थोडा गडद- चॉकलेटी रंगाची असते आणि याचा प्रौढ व्यक्तीच्या मलाप्रमाणेच वास येतो.

४. बाटलीने वरचे दुध द्यायला सुरवात केल्यानंतर.

जर तुम्ही स्तनपान बंद करून बाटलीने वरचे दुध देणार असाल तर हा बदल हळू हळू करा. या प्रक्रियेला वेळ द्या , आधी काही आठवडे थोडे थोडेच दुध देऊन मग सुरुवात करा. असे केल्याने बाळाला बद्धकोष्ट होणार नाही आणि त्याचे शरीर हा बदल स्वीकारण्यास तयार होईल.

बाटलीने दुध सुरु केल्यानंतर तुम्हाला सुजलेल्या आणि वेदनादायक स्तनांचा त्रास होणे कमी होईल. तुम्हाला स्तनापानातून आराम मिळेल पण बाटलीच्या दुधामुळे बाळाचे शी करण्याचे एक वेगळेच रुटीन तुम्हाला सांभाळावे लागेल.

५. घन आहार सुरु केल्यावर.

घन आहार सुरु करण्याचा बाळाच्या शी वर मोठा परिणाम होतो. जसे जसे तुम्ही बाळाला घन पदार्थ खाऊ घालाल तसं तुम्हाला बाळाच्या शी मध्ये घट्टपणा येत असल्याचे जाणवेल. जे खाऊ घातले आहे ते त्या शी च्या टेक्सचर वर परिणाम करेल. बाळ जसे मोठे होईल तशी त्याची पचनशक्ती सुधारेल आणि तंतुमय पदार्थ पचवणे त्याला सोपे जाईल. घन आहारात वेगवेगळे पदार्थ द्यायला सुरवात केल्यानंतर त्याच्या मलाचा ठळक वास देखील येईल.   

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon