Link copied!
Sign in / Sign up
11
Shares

बाळाचा विचार करण्यापुर्वी या गोष्टींचा विचार करा

लग्नानंतर नवरा बायको दोघेही नोकरी व्यवसायानिमित्त घराबाहेर पडणे ही आता काही आश्चर्याची गोष्ट राहिलेली नाही. काळाची गरज म्हणा किंवा करिअर करण्याची संधी असो नोकरी किंवा व्यवसायात जोडपी गुंतलेली दिसतात. लग्न झाल्यानंतर नोकरी व्यवसायाची गरज म्हणून किंवा नात्यात स्थिर होण्यासाठी लगेचच मूल होऊ देण्याचा विचार केला जात नाही. मात्र जेव्हा बाळाचा विचार केला जातो तेव्हा फक्त बाळाच्या आगमनाचा किंवा त्यातून मिळणाऱ्या आनंदाचा विचार करुन चालत नाही तर बाळ आल्यानंतर काही जबाबदाऱ्या आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या जुळवून घेण्याच्या गोष्टींचा विचार नक्कीच करावा लागतो. त्याला तडजोड म्हणा किंवा काहीही. त्यामुळे नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या म्हणजेच कामकाजी जोडप्यांनी बाळ जन्माला घालण्याचा निर्णय घेण्यापुर्वी नक्कीच काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे.

दोघांचा निर्णय

बाळ जन्माला घालणे हा पालक म्हणून दोघांचाही जबाबदारीचा निर्णय असतो. बाळाचा जन्म हा नक्कीच नवरा बायको म्हणून असणाऱ्या आयुष्यात बदल घडवणारा निर्ण़य असतो. पालकत्वाची जबाबदारी नवरा बायको दोघांचीही असली पाहिजे. अनेकदा एकाला हवेसे आहे म्हणून बाळ जन्माला घालण्याचा निर्णय दुसऱ्यासाठी बंधनकारक ठरतो. अशा वेळी बाळाच्या संगोपनावर त्याचा परिणाम होऊ शकतो.त्यामुळे बाळाची जबाबदारी तुझी कि माझी हा वादाचा मुद्दा नंतर येऊन काही उपयोग नाही.

संगोपनाच्या कल्पना

काही वेळा आई वडील म्हणून बाळाचे संगोपन कसे करावे याच्या कल्पना वेगवेगळ्या असू शकतात. त्यात मतभेद असले की गोंधळून जायला होते. तसेच बाळ अगदी लहान असताना ते बहुतेकवेळा आईवर अवलंबून असते qकबहुना बाळाची काळजी आईलाच घ्यायची असते. कारण ते सर्वस्वी स्तनपानावर अवलंबून असते. काही कालावधीनंतर म्हणजे बाळ रांगू लागले, बसू लागले की त्याला जेवण भरवणे, त्याचे लंगोट qकव डायपर बदलणे, बाळाला अंघोळ घालणे, पुसून घेणे, खाऊ घालणे या सर्व गोष्टीत पालक म्हणून दोघांनीही जबाबदार असणे गरजेचे आहे. एकटी आईच हे सर्व करेल अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. तशी सक्तीही करु नये. अन्यथा नात्यांमध्ये तणाव निर्माण होतात आणि पर्यायाने बाळाच्या संगोपनावरही त्याचा परिणाम होतो.

नोकरी की गृहिणी

बाळाचे संगोपन ही जबाबदारीची आणि दिवसरात्र करण्याची गोष्ट आहे. त्यामुळे बाळंतपणानंतर आई जेव्हा नोकरी किंवा व्यवसायात परत रुजु होते तेव्हा बाळाचे संगोपन, घरची जबाबदारी आणि काम यांच्यात समन्वय साधणे कठीण होते. कारण बाळाच्या गरजा आणि नोकरीतील गरजा यांच्यात मेळ घालण्याचे आव्हान तिच्या समोर असते.

बाळांच्या बदलत्या वेळा

बाळ झाल्यानंतर त्याच्या झोपेच्या वेळा बदलत असतात तेव्हा दिवसभर बाळाला सांभाळून रात्रीही आईनेच बाळासमवेत जागरण करावे हे आईच्या प्रकृतीसाठी योग्य नसतेच. त्यामुळे थोडा वेळ का होईना पण बाळासोबत जागरण करण्याची जबाबदारी बाबाने पार पाडली पाहिजे. त्यातही आई ने काही कालावधीनंतर नोकरी किंवा व्यवसाय पुन्हा सुरु केले असेल तर ते तिच्यासाठी नक्कीच आव्हानात्मक असते. त्यामुळे पालक म्हणून जागरणे क़रण्याची जबाबदारी दोघांचीही असली पाहिजे.

बाळाची काळजी किंवा सांभाळ

अनेकदा दोन्ही पालक नोकरी व्यवसायानिमित्त लहान बाळाला घरी किंवा पाळणाघरात किंवा डेकेअरला ठेवून जातात. काही वेळा घरी आजी आजोबा किंवा सांभाळायला दाई ठेवली जाते. डे केअरला ठेवताना लहान बाळासाठी योग्य जागा, स्वच्छता, टापटीप तसेच कार्यरत कर्मचारी वर्ग तसेच लहान बाळांना सांभाळण्याचा त्यांचा अनुभव कसा आहे याची सखोल चौकशी करावी. बाळ तिथे रमते की नाही याचा अंदाज घेण्यासाठी काही वेळ द्यावा. धीर धरावा. घरात दाई ठेवतानाही तिचा अनुभव, तिच्या सवयी, स्वच्छता याबाबत दक्ष राहिले पाहिजे. थेट हातात सोपवून जाण्याआधी आपल्या हजेरीत तिचे काम, बाळाला सांभाळण्याची पद्धत आदींची पारख करावी. चार ठिकाणी चौकशी करून मगच बाळ नीट राहते ना हे पाहून मगच दाई ठेवावी.

आजी आजोबांकडे ठेवतानाही त्यांच्या वयाचा विचार करून पूर्णपणे त्यांच्यावर जबाबदारी टाकावी का याचा विचार करावी. अन्यथा त्यांना कोणी मदतनीस हवी असल्यास ठेवावे.

बाळाचा आहार

आई वडिल दोघेही नोकरीला आहेत म्हणून मुलांच्या आहाराकडे दुर्लक्ष होता कामा नये. झोप आणि आहार यांचा योग्य ताळमेळच मुलांच्या विकास क़रण्यास महत्त्वाचा असतो. त्यामुळे नोकरीला जाताना मुलांच्या आहाराचे योग्य नियोजन आणि तयारी करुन ठेवली पाहिजे. बाळांना लागणाऱ्या आहाराची पूर्वतयारी असावी. योग्य वेळी आहार दिला जातो आहे की नाही याकडे लक्ष ठेवताना दोघांनीही सजग राहिले पाहिजे.

बाळाला दिला जाणारा वेळ

बाळा आल्यानंतर त्याला सर्वाधिक वेळ कसा देता येईल याचा विचार केला पाहिजे. नवरा बायको म्हणून एकमेकांना खूप वेळ नाही देता येणार याची स्पष्टता दोघांमध्ये असली पाहिजे. कमी वेळ चांगल्या पद्धतीने घालवता येऊ शकतो.

घरकामाचे नियोजन

दिवसाचे काही तास घराबाहेर राहिल्यानंतर आईचा वेळ घरातल्या कामात, उठाठेवी क़रण्यात गेला तर तिला बाळाला वेळ देता येणार नाही. त्यामुळे घरकामाचे नियोजन करावे. तसेच बाळ येण्यापुर्वीच्या आयुष्यात काही बदल निश्चित होणार किंवा ते करून घ्यावे लागणार. उदाहरणार्थ ़खाण्यापिण्याच्या वेळा, सवयी यातही बदल करावे लागणार.

बाळाला सोडणे आणणे

डे केअर मध्ये सोडत असाल तर हा मुद्दाही वादाचा होतो. त्यामुळे बाळ येण्याआधी अशा काही मुद्द्यांविषयी समोरासमोर चर्चा केली पाहिजे. म्हणजे नंतर त्यावरून वाद झडायला नको आणि मूल म्हणजे बंधन असा विचार मनात रुजा़यला नको. कारण या विचाराने बाळ वाढवल्यास त्याच्या वाढीवर निश्चितच परिणिम होणार.

शेवटी बाळाचा जन्म ही जबाबदारीच गोष्ट आहे त्यामुळे शिक्षणाचा उपयोग फक्त पैसा कमावण्यासाठी करायचा की नोकरी आणि बाळ यांच्यात समन्वय साधता आला पाहिजे. कारण बाळाला जन्माला घालण्याचा निर्णय आपला आहे. आईवडिल होण्याचा निर्णय आपला असल्याने एक जीव जन्माला घालत असतो त्यामुळे त्याला वेळ देणे, योग्य संगोपन, सवयी, संस्कार त्याच्या अंगी बाणवणे हे महत्त्वाचे काम पालक म्हणून आपल्यालाच करायचे आहे.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon