Link copied!
Sign in / Sign up
201
Shares

बाळाचा आहार कसा असावा-महिन्यानुसार

बाळाचा आहार ह्या संबंधी खूप आईंना चिंता असते. कारण त्यांच्या बाळाचे पोट पूर्णपणे भरतेय का ? आणि बाळाच्या जन्म झाल्यावर आईच्या दुधाशिवाय इतर आहार देता येत नाही. कारण बाळाची पचन क्रिया पूर्णपणे सुधारली नसते, त्याची रोग प्रतिकार शक्ती पूर्ण विकसित झाली नसते म्हणून त्याला लगेच ऍलर्जी किंवा तो आहार बाळाला पचत नाही. त्यामुळे स्तनपान देत असतात. आणि स्तनपानतून पूर्ण पोषक घटक बाळाला मिळत असतात. तेव्हा ह आपण बाळाच्या आहाराविषयी महिन्यानुसार काही टप्पे जाणून घेणारा आहॊत.

१. पहिले सहा महिने

२. ६ ते ८ महिन्या पर्यंतचा आहार

३. ८ ते ११ महिन्याचे

४. एका वर्षाच्या मुलाचा आहार

५. कोणते पदार्थ बाळाला देणे टाळावे.

पहिले सहा महिने

 

साधारणतः पहिले सहा महिने बाळाला स्तनपानच द्यावे असे सांगण्यात येते. कारण या काळात बाळाची पचन यंत्रणा इतर अन्न पचवण्या इतकी सक्षम झालेली नसते आणि ही यंत्रणा सक्षम होण्यास साधारण सहा महिने लागतात. मात्र सहा महिन्यांनंतर बाळाच्या वेगवान वाढीसाठी आईचं दूध पुरं पडत नाही. लोह आणि कॅल्शियमची कमतरता भासू लागते. त्यामुळे साधरणतः सहा महिन्यानंतर बाळाला वरचा आहार सुरु करण्यास हरकत नसते पण याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

कधी-कधी काही बाळांना ६ महिन्याच्या आतच आईचे दूध पुरेनासा होते अश्यावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने लहान मुलांना वरचा आहार सुरु करावा. यामध्ये साधारणतः मऊ, गुळगुळीत आणि गिळायला सोपा जाईल अश्या पदार्थांचा समावेश असला पाहिजे.

सुरुवातीला तांदूळ किंवा ओटमीलचं तयार सीरियल आईच्या दुधात, फॉम्र्युला मिल्कमध्ये उकळून गार केलेल्या पाण्यात कालवावं. आणि बाळाला द्यावे ( हे देण्या आधी डॉक्ट्रांचा सल्ला महत्वाचा)सहा महिन्यानंतर स्तनपान हळू-हळू कमी करावे. पण पूर्णतः बंद करू नये. ६ महिन्याच्या बाळाच्या आहाराबाबत अधिक माहितीसाठी ० ते ६ महिन्याच्या बाळाच्या आहाराविषयी काही गोष्टी

सहा महिन्यानंतर असा आहार देण्यास सुरवात करावा.( ६ ते ८ महिने )

१. हा आहार मऊ, गुळगुळीत आणि गिळायला सोपा असला पाहिजे.सुरुवातीला तांदूळ किंवा ओटमीलचं तयार सीरियल आईच्या दुधात, फॉर्म्युला मिल्कमध्ये उकळून गार केलेल्या पाण्यात कालवावं.आणि अगदी मऊसर गुळगुळीत करून बाळाला भरवावे.

२. घरी तांदूळ आणि मुगाच्या डाळीचा रवा काढून तो मऊ शिजवूनही अशी पेज बाळाला देता येईल.

३. अधून-मधून वरणाचे पाणी, थोडंसं मीठ घातलेले सूप किंवा फळाचा रस द्यावा. फळांचा रस देतांना बिया त्यात नसतील याची काळजी घ्या.

हे लक्षात असू द्या

.१. बाळानं घास गिळलाय ही खात्री झाल्याखेरीज पुढचा घास भरवू नये.

२. बाळाला चमच्यातला पदार्थ ओढून घेता येत नाही हे लक्षात घेऊन चमच्याच्या टोकावर छोटासा घास घेऊन त्याला भरवावा

३. सुरुवातीच्या या दिवसांत रोज फक्त एकदाच एकच पदार्थ भरवावा.

४. एका पदार्था भरवताना काही बाळाची काही तक्रार वाटली नाही तर तो पदार्थ बाळाच्या आहारात घ्यावा

५. नवीन पदार्थ दिल्यावर बाळाची प्रतिक्रिया महत्वाची असते.त्यानुसार बाळाला काय पचते काय चालते हे जाणून घ्यावे.

८ ते ११ महिन्याच्या बाळाचा आहार

बाळाचा आठवा महिना पालकांसाठी फारच आश्चर्यकारक असू शकतो. तो लहानसा जीव स्वतःच इवलसं शरीर उचलून जेव्हा आपल्या हातातला चमचा हिसकावू पाहतो, तेव्हा आपण समजायचा कि त्याला स्तनपानाचा कंटाळा आलेला आहे आणि आता चिमुकल्यासाठी आईने नवीन आहार सुरु करायची हिच योग्य वेळ आहे. आता त्याला दिवसातून तीन वेळा तरी पूरक आहार दिला पाहिजे. त्यात एक तृणधान्य, एक भाजी आणि एक फळ याचा समावेश करावा. 

बाळाला नाष्टा म्हणून पोटभर स्तनपान द्यावे. नाष्टा झाल्यावर काही वेळाने, पण जेवणाआधी बाळाला गाजर शिजवून कुस्करून द्यावे.

१. जेवणामध्ये मऊसर बाळाला गिळता येईल अशी मुगाचा डाळीची खिचडी, त्यानंतर संध्याकाळी स्तनपान.

२. रात्री एकदा पुन्हा शिजवलेलं गाजर अथवा उकडलेला बटाटा द्यावा.

३. झोपताना पुन्हा एकदा स्तनपान देऊन बाळाला झोपवावे

४. मऊ शिजणाऱ्या भाज्या आणि फळं यांचा शिजवून लगदा (प्युरी) हा पुढचा आहार आहे.

५. सुरुवातीला पालक, भोपळा, कोहळा, रताळं, गाजर (किसून) अशा भाज्या स्वच्छ धुऊन बारीक चिरून मऊ वाफवून घ्याव्यात. त्यात पाणी घालू नये. त्यानंतर त्या चमच्याने मऊ घोटून भरवाव्या.

६. फळांमध्ये सफरचंद (किसून) पेअर, चिकू, केळं हेसुद्धा साल, बिया काढून वाफवून घ्यावं. लक्षात ठेवा, एकावेळी एकच भाजी किंवा फळ द्यायचं आहे.

असे साधारण आहाराचे वेळापत्रक असावे. बाळाच्या क्षमतेनुसार बाळाला कमी जास्त आहार करत रहावा. म्हणजे बाळाला संध्याकाळी खिचडी किंवा उकडलेला बटाटा दिला आणि बाळाचे पोट भरले असले तर स्तनपान देऊ नये. खिचडीच्या ऐवजी मऊसर भात त्यात तिखट नसलेली आमटी किंवा वरण बाळाला भरवावे. विविध प्रकारच्या जसे गव्हाची,ओट्सची मऊसर लापशी द्यावी. आठ महिन्याच्या बाळाचा आहार तक्ता जाणून घेण्यासाठी आठ महिन्याच्या बाळाचा आहार तक्ता 

१ वर्षाच्या बाळाचा आहार

एक वर्षांच्या बाळाला तुम्ही घरात शिजवता किंवा तुम्ही ते खाता आलं पाहिजे.पदार्थाना चव आणण्यासाठी हिंग, सुंठ, जिरेपूड, धणेपूड, दालचिनीचा वापर करावा.आता लहान मुलाला थोडं वेगळं आणि थोडंसं जड अन्न खाऊ शकते आणि त्याला खाऊ घालणेही सोप्पे जाते. तसेच विविध खाण्याबाबत कुरबुरी देखील चालू होतात त्याला हा आहारातला बदल आवडू लागतो आणि खाताना ते जास्त त्रासही देत नाही. आणि जर तुमचे बाळ खाली ११ महिन्याच्या शिशुसाठी आहार नियोजन दिले आहे, यावरून त्याला काय खाऊ घालावे आणि काय नाही हे पालकांच्या लक्षात येईल. स्तनपानाविषयी बोलायचे झाले तर, १ वर्ष पूर्ण होत आले म्हणून बाळाचे स्तनपान बंद करू नये. कमीत -कमी ६ महिने आणि १२-१८ महिन्याचे होईपर्यंत शिशूच्या आहारात स्तनपान महत्वाचे असते.

एक वर्षांपूर्वी हे पदार्थ देणं टाळावे

बाळ वर्षांचं होईपर्यंत काही पदार्थ त्याला देऊ नयेत. ते म्हणजे अंडय़ाचा पांढरा भाग, मीठ, साखर, (कमी प्रमाणत दयावे)तळलेले पदार्थ, मध, शेंगदाणे, काजू, पिस्ते (याला अ‍ॅलर्जी येऊ शकते), गाईचं दूध, (डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय )चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स देऊ नये. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon