Link copied!
Sign in / Sign up
13
Shares

बटाट्याचे काही चटपटीत पदार्थ

 


१. फिंगर चिप्स 

साहित्य-४ ते ५ मोठे बटाटे,तळण्यासाठी तेल,चवीपुरते मीठ

कृती:

१. बटाटे सोलून घ्यावे आणि  उभे तुकडे करून घ्यावे.

२. पाण्यात बुडवून ठेवावे आणि हलकेच चोळून घ्यावे. पाणी काढून टाकावे. बटाट्याचे काप स्वच्छ सूती कापडावर काढून ठेवावे.

३. तेल कढईत तापवावे. तेल तापले की आच मध्यम करावी. एकाच वेळी सर्व काप तेलात घालू नयेत.

४. फ्राइज तळावे.  त्यानंतर फ्राईज बाहेर काढल्यानंतर गरम असतानाच त्यावर मीठ भुरभुरावे.

बटाटा वेफर्स

 

साहित्य : एक किलो,थोडे मीठ,चिमुटभर तुरटी, पाणी 

कृती :

बटाटे स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्याची  त्याची साले काढून घ्यावी बटाटे धुवून घ्यावे 

नंतर  वेफर्सच्या किसणीवर त्याच्या काचऱ्या करून त्या एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात टाका 

त्यानंतर  एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवा, पाण्याला उकळी फुटली कि त्यात तुरटीची लाही व मीठ घाला. 

पाण्यात ठेवलेल्या बटाट्याच्या काचऱ्यांतील पाणी काढून टाकून उकळत्या पाण्यात काचऱ्या टाका . काचऱ्या वर येऊ लागल्या त्या झाऱ्याने बाहेर काढून चाळणीत निथळत ठेवा. नंतर या काचऱ्या उंन्हात कडकडीत वाळवा. नंतर डब्यात भरू ठेवा आणि हवे त्यावेळी तळून खा

बटाटा चकल्या

साहित्य-बटाटे, हिरव्या मिरच्या, मीठ,कोथिंबीर, तीळ,, डाळीचे पीठ साबुदाणा पीठ 

कृती

बटाटे उकडून, सोलून, किसून घ्या. त्यात वाटलेल्या हिरव्या मिरच्या, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडेसे तीळ घालून मळा.मिश्रण बांधले जावे म्हणून  डाळीचे पीठ घाला. उपाससाठी करत असाल तर थोडं साबुदाणा पीठ घाला  नंतर मळून चकल्या करा.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon