Link copied!
Sign in / Sign up
16
Shares

असा करा मस्त बटाटा-चीज पराठा

 ही पाककृती आम्हांला दिपाली देशमुख यांनी पाठवली आहे 

साहित्य 

२ बटाटे, १ चीज क्युब, १ वाटी गव्हाचे पीठ, जीरे पावडर, मीठ, लोणी, कोथिंबीर, ओवा.

कृती

गव्हाचे पीठ घ्यावं त्यात थोड मीठ, ओवा घालून ते पीठ मळून घ्यावे.

त्यानंतर सारणासाठी आधी बटाटे उकडून घ्यावेत, ते थंड झाल्यावर कीसुन घ्यावे त्यात १ चीज क्युब कीसुन घ्यावे त्यात किंचित मीठ, कोथिंबीर, जीरे पावडर घालून ते मिश्रण चांगले एकत्र करुन त्यांचे गोळे बनवून घ्यावे.

नंतर गव्हाच्या पिठाचा उंडा घ्यावा त्याचा लहान गोळा करून त्यात वरील सारण भरून हलक्या हाताने पराठे लाटून तव्यावर थोडे तेल घालून भाजून घ्यावे वरून त्यावर लोणी टाकुन लहान मुलांना खायला द्यावा.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon