Link copied!
Sign in / Sign up
31
Shares

जाणून घ्या प्रजननासाठी स्त्री बीज आणि पुरुषबीज कसे तयार होतात

असे तयार होते स्त्री बीज 

एका स्त्रियांच्या बाबतीत ती गरोदर राहण्याची शक्यता ही तिच्या अंडाशयातून सुरु होते. गर्भाशयाच्या दोन्ही बाजूंना अंड्याच्या आकाराच्या २ छोट्या कोशिका असतात त्यांना अंडाशय असे म्हणतात. या अंडाशयात अंडज (अंडी) असतात ज्या तुमचा जन्म होण्याआधीपासूनच शरीरात विकसित झालेल्या असतात. कोणत्याही स्त्रीच्या शरीरातील अंडाशयात जन्मजात १० ते २० लाख अंडज असतात. जन्म झाल्यावर यातील अनेक अंडज मरून जातात तर उर्वरित अंडज कालांतराने जसे स्त्रीचे वय वाढते तसे कमी कमी होत जातात. तुम्ही पहिल्या मासिक पाळीपासून ते मेनोपॉज पर्यंत जवळपास ४०० अंडज (अंडी) तुमच्या शरीरातून बाहेर टाकता.

प्रत्येक मासिक चक्रानंतर, पाळीच्या काही दिवसांनी दोन्हीपैकी एका अंडाशयातील १ ते ३ अंडज हे प्रौढावस्थेत (मॅच्युरीटी) जातात. यातील सर्वात जास्त वाढलेले अंडज बाहेर सोडले जाते या प्रक्रियेला ‘ओव्युलेशन’ म्हणतात. या अंडाशयातून सोडले गेलेले अंडज ट्युलिप फुलासारखा आकार असणाऱ्या प्रवेशद्वाराने २ फेलोपाइन ट्यूबस् मध्ये ओढले जाते. या फेलोपाइन ट्युब्स प्रत्येकी १० सेमी लांबीच्या असतात ज्या अंडाशयाला गर्भाशयाशी जोडतात.

ओव्युलेशनची प्रक्रिया तुमच्या पुढच्या मासिक पाळीच्या १२ ते १४ दिवस आधीपासून चालते. ओव्युलेशनची तंतोतंत वेळ तुमच्या मासिक चक्रावर अवलंबून असते. तुमच्या शरीरातील अनेक संप्रेरके आणि त्यांचे कार्य तुमच्या ओव्युलेशनची वेळ, तुमच्या अंडाशयातून अंडज बाहेर येण्याची वेळ आणि मासिक पाळीच्या दिवसांची वेळ ठरवत असतात. मासिक पाळी संबंधित आमच्या लेखात तुम्ही या विषयी अजून माहिती मिळवू शकता.

 

एक अंडज अंडाशयातून बाहेर आल्यावर साधारणतः २४ तास जिवंत राहते. गर्भधारणा होण्यासाठी या काळात शुक्राणूंसोबत त्यांचे मिलन होऊन फलनीकरण होणे गरजेचे असते. जर अंडज या काळात गर्भाशायाकडे जातांना एखाद्या निरोगी शुक्राणुशी त्याचे मिलन झाल्यास नवीन जीव निर्माण होण्याची प्रक्रिया सुरु होते. जर हे मिलन झाले नाही तर ते अंडज गर्भाशयात जाते आणि तिथे त्याचे विघटन होणे सुरु होते.

जर तुमची गर्भधारणा याप्रमाणे झाली नाही तर अंडाशय एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरोन ही दोन संप्रेरके निर्माण करणे थांबवते. ही दोन संप्रेरके गर्भधारणा होण्यासाठी खूप महत्वाची असतात. जेंव्हा या दोन संप्रेरकांची पातळी कमी पडते तेंव्हा गर्भाशयाची आतील बाजूची लाईनिंग म्हणजेच जाड अस्तर शरीरातून बाहेर टाकले जाते. आणि यासोबतच फलनीकरण न झालेले अंडज देखील शरीरातून बाहेर पडते. यालाच आपण मासिक पाळीतील रक्तस्त्राव असे म्हणतो.

पुरुषबीजाची निर्मिती.

स्त्रीचे शरीर महिन्याला एकाच अंडज घडवते. पुरुषांच्या बाबतीत ही प्रक्रिया सतत चालू असते आणि यातून लाखो मायक्रोस्कोपिक स्पर्म्स म्हणजेच शुक्राणु तयार होतात. या शुक्राणूंचा उद्देश स्त्रीबिजाच्या दिशेने जाऊन त्यात एकजीव होण्याचा असतो.

जी संप्रेरके स्त्रीच्या शरीरात ओव्युलेशन नियंत्रित करतात ती पुरुषांच्या शरीरात टेस्टेस्टेरॉन नावाच्या संप्रेरकाची निर्मिती सांभाळतात. हे संप्रेरक शुक्राणुंच्या निर्मितीस कारणीभूत असतात. शुक्राणूंची निर्मिती ही २ टेस्टीकल्समध्ये सुरु होते. टेस्टीकल्स हे पुरुषाच्या लिंगाच्या खाली पिशव्यांच्या स्वरुपात असतात. हे तापमानास अतिशय संवेदनशील असल्यामुळे शरीराच्या बाहेरील बाजूस असतात. निरोगी शुक्राणूंची निर्मिती करण्यासाठी टेस्टीकल्सचे तापमान ३४ डिग्री सेल्सिअस असावे लागते. हे तापमान मानवी शरीराच्या सामान्य तापमानापेक्षा ४ डिग्रीने कमी आहे. पुरुषबीजाची निर्मिती झाल्यानंतर टेस्टीकल्स मधील ६ मीटर लांबीच्या एपिडीडायमिस या गुंडाळलेल्या नळीमध्ये ते जमा होतात. एजॅक्युलेशन म्हणजे स्खलन होण्यापूर्वी विर्यामध्ये मिसळले जातात.

एजॅक्युलेशनच्या वेळी बाहेर पडणाऱ्या लाखो शुक्राणूंपैकी केवळ १ शुक्राणु स्त्रीबीजाशी एकरूप होणार असतो.  आणि यांच्या मिलनानंतर नवीन जीव तयार व्हायला सुरवात होते           

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon