Link copied!
Sign in / Sign up
2
Shares

पहिल्यांदा आईपण निभावताना या चार गोष्टी तुम्ही निश्चितच अनुभवणार


आपल्या घरात एक छोटे गोंडस बाळ आल्यानंतर त्याला सोडून बाहेर पडताना आई म्हणून खूप त्रास होतो. मग ते किराणाच्या दुकानात जाणे असो किंवा कामासाठी कार्यालयात जाणे असो. घराबाहेर पडताना रडणारे छोटासा जीव असा काही तास सोडून बाहेर पडताना जीव तीळ तीळ तुटतोच. आज आम्ही तुम्हाला काही अनुभव सांगणार आहोत ज्या गोष्टींचा तुम्ही देखील एक नवीन आई म्हणून निश्चितच अनुभव घेत असाल.

आईला येणारी अपराधीपणाची भावना 

 प्रसूती रजेनंतर पुन्हा रुजू होताना तुमच्यामध्ये खूप बदल घडवावा लागतो. तुम्ही बाहेर पडताना बाळाच्या देखरेखीसाठी बरेच मदतीचे हात असतील. एक आई म्हणून तुमच्या मनात घरातून बाहेर पडताना अपराधीपणाची भावना येऊ शकते आणि नकळत आपल्या डोळ्यात पाणी येते. पुन्हा कामावर जाण्याचा निर्णय घेणाऱ्या प्रत्येक नव्या मातेच्या मनात असा विचार येतोच. जेव्हा तुम्हाला थोडा मोकळा वेळ असले तेव्हा तुमच्या बाळाशी फोन किंवा व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क करून तुमच्या भावनांवर संयम मिळवू शकता किंवा तुमच्या कामात सहकाऱ्यांची मदत घेऊन काम लवकर पूर्ण करून लगेच घरी येऊन बाळाला भेटू शकता. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जे काही करत आहात ते तुमच्या बाळाच्या आनंदासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी.

वेळेबाबत खूप संवेदनशील होता 

जर तुम्ही आई होण्याआधी तुमच्या मैत्रिणींसोबत मजा मस्ती करत असाल तर आता मात्र तुम्हाला तुमचे घड्याळ दहा पट वेगानी चालवायला लागेल. जेव्हा जेव्हा तुम्ही बाळाला घरात सोडून बाहेर पडता त्या क्षणापासून तुमच्या डोक्यात विचारचक्र सुरू होते. बाळ काय करत असेल? भुकेमुळे रडत असेल का? आई जवळ नाही म्हणून रडत असेल का? असे विचार घोळतात. तुम्हाला तुमचा प्रत्येक मिनिट आपल्या बाळाला द्यायचा असतो त्यासाठी तुम्हाला खरंच खूप कमी वेळात पट पट कामे उरकावी लागतात मग ते साधे किराणा सामान आणायला गेलात किंवा तुमच्या ऑफिसला गेलात.

स्वत:च्या नव्या क्षमतांसह इतरांना अचंबित करता 

 नव्याने आई झाल्या नंतर तुम्ही सगळी कामे अगदी अल्प काळातच पूर्ण करता आणि या तुमच्या क्षमतांमध्ये तुम्हाला सात्यातने वृद्धी होताना दिसेल. तुम्ही तुमच्या बाळाला घरी सोडून जाताना तुम्ही सगळीच कामे अगदी लगबगीने करण्याचा प्रयत्न करता मग ते सामान खरेदी असो किंवा डॉक्टरांकडे जाऊन येणे असो. तुमच्या ऑफिसचे आणि इतर कामे करताना तुमचे बाळ तुमच्या सोबत नसते या साठी तुम्ही स्वतःला खूप कार्यक्षम बनवता कारण तुम्हाला तुमच्या बाळाला जास्तीत जास्त वेळ द्यायचा असतो आणि हाच आवेश तुमच्या कामात गती आणि कार्यक्षमता वाढवते.

खूप मोठ्याने जोरात रडणे 

कामाला जाण्यासाठी तयार होत असताना आणि निघताना बाळ बऱ्याचवेळा खूप मोठ्याने रडत असते अशावेळी नव्याने आई झालेल्या स्त्रिया बरेचदा चिडचिड करतात. तुम्हाला खरोखरच आई असून देखील घराबाहेर पडताना अनोळखी असल्यासारखे वागावे लागते. तुमचे बाळ त्याच्या डोळ्यात अश्रू आणून त्याला घेण्यासाठी विनवत असले तरी देखील तुम्हाला त्याला सोडून जावेच लागते. हे लक्षात असुद्या की, जसे ते मोठे होईल तसे ते तुम्ही आजूबाजूला नाही ही गोष्ट स्वीकारेल आणि त्यांना देखील समजेल की तुम्ही सतत त्यांच्या बरोबर राहू शकत नाही.

बाळाला घरी सोडून जाणे सोपे नसले तरी अर्थ असा नाही की, हे सगळेच खूप वेदनादायी किंवा कठीण असेल.  

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon