Link copied!
Sign in / Sign up
9
Shares

जाणून घ्या गरोदरपणात करण्यात येणारे टीआयएफएफए - फेटल अ‍ॅनामोली स्कॅन महत्वाचे का असते

गर्भवती राहणे किंवा बाळ होणार हा कोणत्याही स्त्री साठी नक्कीच खूप आनंददायी अनुभव असतो. मग तिचे पहिले बाळंतपण असो किंवा पाचवे. आपल्या होणाऱ्या बाळाच्या विकासाविषयी अधिकाधिक जाणून घेताना नव्या मातेला जो आनंद होतो तो इतका अवर्णनीय असतो की जगदुनियेतील कोणत्याही आनंदाशी त्याची तुलनाच नाही होऊ शकत.

गर्भावस्थेतील पहिली तिमाही व्यवस्थित पार पडली आणि पुढचा टप्पा सुरु झाला की गर्भवती स्त्री किंवा होऊ घातलेली माता शांत आणि आरामात राहू शकते. सुरुवातीच्या काळात नॉशिया येणे आणि भावनिक आंदोलने, मनस्थितीतील चढउतार यामुळे थोडा त्रास होतो किंवा वैतागल्या सारखे होते. पण त्यानंतर घडणारी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपण गर्भाच्या प्रारंभिक हालचाली पाहू शकतो. गर्भारपणातील १३ ते २७ आठवड्यांचा हा काळ नितांत सुखदायी काळ असतो असे म्हटले जाते ते याचसाठी.

अर्थात ज्या स्त्रिया पहिलटकरीण किंवा नव्याने आई होणार असतात आणि संपूर्ण कुटुंब येणाऱ्या आनंदाच्या प्रसंगाकडे नजर लावून बसलेले असतात गर्भावस्थेत केल्या जाणाऱ्या प्रत्येक चाचणीविषयी खूप काळजी करणेही गरजेचे होऊन जाते आणि त्या चाचण्यांमध्ये गर्भाविषयी काय निदान सांगितले जाईल याविषयी काळजी वाटते. गर्भावस्थेत जितक्या महत्त्वाच्या चाचण्या केल्या जातात त्यातील एक महत्त्वाची चाचणी असते ती म्हणजे टीआयएफएफए स्कॅन.

टीआयएफएफए स्कॅन म्हणजे काय

टार्गेटेड इमेजिंग फॉर फीटल अ‍ॅनोमालिज म्हणजेच टीआयएफएफए. (बाळामध्ये काही शारिरीक विसंगती आहे का हे पाहाण्यासाठी केली जाणारी चाचणी). या नेहमीच्या अल्ट्रासाऊंड स्कॅनमुळे गर्भातील बाळाचे संपूर्ण शरीर पाहता येते आणि बाळाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टींची सखोल तपासणी करणे शक्य होते ज्यामध्ये काही गुंतागुतीच्या घटकांचा समावेश असतो. जसे बाळाची नाळ, गर्भनलिका आणि गर्भाच्या अवतीभोवती असणारी गर्भजलाची पातळी या सगळ्याचा सखोल अभ्यास केला जातो.

या सखोल चाचणी किंवा स्कॅन हे दुसऱ्या तिमाहीच्या काळात केले जाते. सर्वसाधारणपणे गर्भावस्थेतील १८ ते २१ आठवडे या काळात केला जातो. काही बाबतीत नंतर म्हणजे २१ व्या आठवड्यातही हे स्कॅqनग केले जाते. तेव्हा गर्भावस्थेचा अर्धा काळ सरलेला असतो आणि पोटातील बाळाचे काही अवयव विकसित झालेले असतात आणि काही विकसित होण्याच्या प्रक्रियेत असतात. टीआयएफएफए स्कॅनमुळे आपल्याला आणि डॉक्टरांनाही गर्भामध्ये काही दुर्मिळ विसंगती किंवा कमतरता आहे का हे कळणे सोपे जाते.

टीआयआयएफए स्कॅन महत्त्व

सर्वसाधारणेपणे मॉर्फोलॉजी स्कॅन किंवा फीटल अनॉमली स्कॅन करण्याचा सल्ला दिला जातो. टीआयएफएफए स्कॅन हे जन्मजात काही वैगुण्य बाळामध्ये आहे का याची खात्री करण्यासाठी किंवा जाणून घेण्यासाठी ची महत्त्वाची चाचणी आहे. हे स्कॅन त्रिमितीय किंवा चौमितीय करता येते आणि अत्यंत उच्च तांत्रिक अचूकता असणाऱ्या प्रयोगशाळेत ३० मिनिटांपर्यंत केली जाते.

टीआयआयएफए स्कॅqनगचा अहवाल गर्भाच्या विकासाविषयी काही ठोस गोष्टी स्पष्ट करतो आणि गर्भाविषयीच्या ११ स्थितींविषयी स्पष्टता देतो. त्यात ओपन स्पाईन बिफीडा (मणका शेवटी पूर्ण बंद होत नाही त्यात फट राहते), दुंभगलेला ओठ, हायड्रोसिफलस(मेंदूत पाणी होणे), डायफ्रॅगमॅटिक हार्निया (पोटातील अवयव छातीकडे सरकणे), हृदयातील गंभीर दोष, बायलॅटरल रेनल एजेनेसिस (जन्मतःच दोन्ही मूत्रपिंड नसणे)

वरील सर्व परिस्थितीव्यतिरिक्त टीआयएफएफए स्कॅनमुळे गर्भातील बाळाविषयी इतरी अनेक गोष्टी कळतात.

गर्भाची हालचाल

गर्भजलाची पातळी

नाळ किंवा गर्भनलिकेची जागा

बाळात असणारे जन्मजात दोष

बाळाची सर्वसाधारण वाढ

बाळाच्या अतंर्गत अवयवांची सर्वसाधारण वाढ

गुणसुत्रीय वैगुण्य किंवा कमतरता यांची लक्षणे आहेत का

थोडक्यात सांगायचे तर टीआयएफएफए बाळाची अंतर्गत आणि बाह्य अ‍ॅनाटोमी तपासण्याचे काम करते. तसेच शरीरात काही मोठे वैगुण्य किंवा दोष आहेत का, काही गुणसुत्रीय दोष आहेत का तसेच अनुवांशिक काही सिड्रोम दिसतात का या सर्वांची पाहणी या स्कॅनमध्ये केली जाते.

हे स्कॅन गर्भातील बाळासाठी किंवा गर्भवतीसाठी धोकादायक आहे का

अल्ट्रासाऊंड स्कॅनिंग गेल्या काही दशकांपासून गर्भावस्थेत तपासणी साठी वापरले जाते आणि योग्य मार्गदर्शक नियमांचे पालन केल्यास या स्कॅनचा काही दुष्परिणाम होत असल्याचे कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीत. उलटपक्षी हे स्कॅन  करताना संपूर्ण वेळ गर्भवती स्त्री आणि तिच्या पोटातील बाळ सुरक्षित असल्याचे सांगणे ही रेडिओलॉजीस्ट किंवा अल्ट्रासाऊंड डॉक्टरचे कर्तव्य आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे टीआयएफएफए स्कॅन कोणत्याही प्रकारे गर्भवती स्त्रीला अपाय किंवा दुखापत, इजा करत नाही. काही वेळा बाळाची छबी योग्य आणि स्पष्ट दिसावी म्हणून सोनोलॉजिस्टला गर्भवतीच्या पोटावर दाब द्यावा लागतो त्यामुळे कदाचित थोडीशी अस्वस्थता गर्भवतीला वाटू शकते.

 

 

 

इतर कोणताही त्रास गर्भवतीला होत नाही. त्यामुळे टीआयएफएफए ही चाचणी गर्भवती आणि बाळ यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चांगलीच म्हणायला हवी.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon