Link copied!
Sign in / Sign up
47
Shares

गरोदर महिलांची न्याहारी (नाश्ता ) कशी असावी

गर्भावस्थेत स्त्रीच्या आरोग्याची काळजी घेताना तिच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले जाते कारण आईच्या आहारावर गर्भातील बाळाची वाढ अवलंबून असते. त्यामुळे गर्भावस्थेत पोषक आणि सकस आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात काही स्त्रियांना नॉशिआ येतो त्यामुळे फारसे अन्न जात नाही तरीही थोडा थोडा का होईना आहार सेवन करावाच लागतो. गर्भावस्थेच्या संपूर्ण काळात स्त्रीने सकाळची न्याहारी जरुर केली पाहिजे. ही न्याहारी पोषक घटकांनी युक्त पदार्थांची असली पाहिजे. गर्भाच्या वाढीसाठी पुरेसा आहार सेवन करणे आणि योग्य प्रमाणात सेवन करणे अत्यंत गरजेचे असते.

कशी असावी न्याहारी-

गर्भावस्थेच दिवसाची सुरुवात न्याहारी ने करताना त्यात आवश्यक ते सर्व घटक असले पाहिजेत याची काळजी घ्यावी. काँम्प्लेक्स कार्बचे योग्य संतुलन असलेला आहार असावा. शिवाय प्रथिने, जीवनसत्त्व, कॅल्शिअम, चांगली चरबी तसेच ओमेगा ३ या जीवनसत्वाचा सुयोग्य प्रमाणात समावेश असावा. बाळाच्या सुदृढ वाढीसाठी सर्वसाधारणपणे नेहमीच्या आहारापेक्षा ३०० कॅलरीज अधिक सेवन कराव्या लागतात. त्यात वरील गोष्टींचा समावेश असला पाहिजे.

तसेच गर्भावस्थेतील आहारात तंतुमय पदार्थांचाही योग्य प्रमाणात समावेश असावा त्यामुळे पचनसंस्था योग्य राहाते. न्याहारीच्या पदार्थांचा विचार करताना ते पोषक आणि पोटभरीचे असावेत याकडे लक्ष द्यावे. सुरुवातीच्या काळात नॉशिया येतो किंवा मॉर्निंग सिकनेस मुळे सतत कोरड्या उलट्या होतात. त्यावेळी कोरडे पदार्थ खावेत. तसेच फळांचे ज्यूस घ्यावेत.

दूधाचे पदार्थ-

गर्भावस्थेत कॅल्शिअम आवश्यक असतेच. त्यामुळे सकाळी न्याहारीत दुधाचा जरुर समावेश करावा. तसेच दही, ताक, पनीर यांचे सेवन जरुर करावे. दुधाच्या पदार्थातून कॅल्शिअम, प्रथिने आणि बी १२ मिळते. आई आणि बाळासाठी हे गरजेचे असते.

फळे आणि रस-

शक्यतो गर्भावस्थेत ताजी फळे खावी. डब्बाबंद रस पिणे टाळावे. फळांमधून प्रथिने आणि तंतुमय पदार्थ मिळतात. ते सहजपणे पचतात. तसेच शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. पपई वगळता फळे न्याहारीत सेवन करता येतात.

आख्खे धान्य-

आख्खे धान्य सेवन केल्याने जीवनसत्त्व, कॅल्शिअम, प्रथिने आणि तंतुमय पदार्थ आदी घटक शरीराला मिळतात.

अंडे-

गर्भवतीला न्याहारीत उकडलेले अंडे किंवा ऑम्लेट खाता येईल. त्यात कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, लोह आणि फोलिक अ‍ॅसिड असते. गर्भवती महिलांसाठी या सर्वांची गरज असते.

फळे आणि भाज्यांचे सलाड-

न्याहारीसाठी हा देखील उत्तम पर्याय आहे. तंतुमय पदार्थ आणि बी १२ विटामिनही मिळते. तसेच मनोवस्था चांगली करणारे सेरोटोनिन आणि डोपामाईन रसायने मिळतात. त्यामुळे गर्भावस्थेत येणारा थकवा आणि अस्वस्थता कमी होते.

काही पदार्थांच्या रेसिपी पाहूया 

मल्टीग्रेन इडली-

अर्धा कप उडीद डाळ चार पाच तास भिजत घालावी. तसेच चमचाभर मेथी दाणे भिजत घालावेत. पाच सहा तासानंतर हे मिक्सरमधून बारीक फिरवावे. उडीद डाळीचे हे मिश्रण एका बाऊल मध्ये काढून घेऊन त्यात अर्धा कप ज्वारीचे पीठ, अर्धा कप नाचणीचे पीठ आणि अर्धा कप गव्हाचे पीठ टाकून मीठ टाकून छान एकाच बाजूने मिसळून घ्यावे. रात्रभर हे पीठ आंबण्यासाठी ठेवावे. सकाळी पीठ आंबल्यानंतर त्याच चवीनुसार साखर मीठ घालून त्याच्या इडल्या कराव्यात. चटणी किंवा सॉस बरोबर खाव्यात.

हिरव्या मुगाचे डोसे-

एक कप हिरव्या मुगाची सालीसकटची डाळ पाण्यात तीन चार तास भिजत घालावी. तसेच १ कप उकडा तांदुळ पाण्यात भिजत घालावा. तीन चार तासाने दोन्हीतील पाणी काढून निथळून घ्यावे. दोन्ही मिक्सरला सव्वा कप पाणी घालून वाटून घ्यावे. त्यानंतर हे मिश्रण बाऊलमध्ये काढावे. ८ ते १० तास आंबण्यास ठेवावे. त्यानंतर चवीपुरते मीठ घालावे आणि एक चतुर्थांश पाणी घालून मिक्स करावे. आता नॉनस्टिक पॅनवर डोसे घालावेत. दोन्ही बाजूंनी छान सोनेरी रंगावर भाजावेत. चटणी बरोबर खावेत.

ज्वारीचा भाज्या घालून उपमा-

एक कप ज्वारीचे पीठ, तीळ, उडीद डाळ, तेल, qहगस कढीपत्ता, बारीक चिरलो कांदा, अर्धा कप रवा, मटार, गाजर तुकडे करून वाफवून घ्यावेत, हिरव्या मिरच्या चिरून आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.

नॉनस्टिक भांड्यात ते टाकून तीळ, उडीद डाळ टाकावी, त्यात qहग, कढीपत्ता टाकावे मग बारीक चिरलेला कांदा घालून परतावे. आता अर्धा कप रवा घालावा आणि दोन मिनिट तो चांगला भाजावा. आता त्यात ज्वारीचे पीठ घालावे. आणि परतून घ्यावे. खमंग वास आला की वाफवलेले मटार, गाजर टाकावे. त्यात तीन कप आधणाचे पाणी घालावे. सतत ढवळत रहावे म्हणजे गुठळी होणार नाही. आता त्यावर झाकण घालून एक वाफ काढावी. मग त्यावर qलबाचा रस घालून ढवळून घ्यावे आणि चिरलेली कोqथबीर घालावी आणि एक वाफ आणावी. उपमा तयार. हा उपमा गरम गरम खायला द्यावा.

फळे भाज्या सलाड-

या सलाड साठी पालक, कोबी आदी भाज्या चिरून घ्याव्यात. त्यात काकडी, सफरचंद बारीक चिरून घालावे. डाळिंब दाणे, केळाचे तुकडे घालावेत. चवी साठी थोडे मीठ किंवा चाट मसाला घालावा. एकत्र मिसळून खावे.

पालक अंडे ऑम्लेट-

पालक निवडून स्वच्छ धुवून, बारीक चिरून घ्यावा. अंडे फोडून त्यात मीठ, मिरची किंवा तिखट टाकावे. त्याच पालकाची बारीक चिरलेली चार पाने टाकावीत. आता हे मिश्रण छान फेटून घ्यावे. पॅन मध्ये तेल टाकून त्यावर फेटलेले अंडे टाकावे. त्यावर झाकण ठेवावे. दोन मिनिटांनी वरच्या बाजूला थोडे तेल टाकून उलटावे. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून खायला द्यावे.

केळ आणि खजूर शेक-

गर्भावस्थेतील प्रारंभीच्या काळात अन्नावरची वासना उडाल्यासारखे होते. मात्र बाळाच्या वाढासाठी आहार खूप महत्त्वाचा असतो. मग अशा वेळी पौष्टीक घटकांनी युक्त खजूर आणि केळ यांचा शेक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे कॅल्शिअम, प्रथिने, लोह यांचा पुरवठा शरीराला होतो. त्यामुळे शरीराला त्वरीत उर्जा मिळते. मात्र हा शेक बनवल्यानंतर लगेचच सेवन करावा.

पाव वाटी खजूर, अर्धे केळ, १ कप दूध आणि बर्फाचे तुकडे हवे असल्यास. 

गरम दुधात पंधरा मिनिटांसाठी खजूर भिजत घालावेत. आता भिजवलेले खजूर, केळ, दुध हे सर्व एकत्र मिक्सरमध्ये फिरवावे. हवे असल्यास बर्फाचे तुकडे मिक्सरमध्ये फिरवतानाच घालावे. हा शेक लगेचच पिण्यास द्यावा.

 

वरील पदार्थांव्यतिरिक्त विविध भाज्या घालून पराठे केल्यास उत्तम पोटभरीची न्याहारी होईल. आणि दिवसाची सुरुवात उत्तम होईल. तसेच अंड्याच्या ऑम्लेट मध्ये चीज तसेच पनीर घालू शकता. पराठ्यात घालू शकता जेणेकरून दुग्ध जन्य पदार्थ पोटात जातील.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon