Link copied!
Sign in / Sign up
183
Shares

जाणून घ्या गरोदर कसे व्हावे - त्यातील अडचणी उपाय

गर्भधारणा कशी होते हे एक रहस्यच आहे. स्त्री-पुरुषाच्या मिलनातून एक छोटासा जीव जन्माला येतो. हे रहस्य म्हणजे गर्भधारणा कशी होते हे जाणून घेऊया

१. गर्भधारणा कशी होते

२. गर्भधारणेसाठी योग्य काळ कोणता

३. गर्भधारणेवर परिणाम करणाऱ्या गोष्टी

४. गर्भधारणेसाठी पर्याय

गर्भधारणा कशी होते

१. मासिक पाळी सुरू झाल्यानंतर साधारण १४व्या दिवशी स्त्रीच्या अंडकोषातून एक बीजांड बाहेर पडते.(प्रत्येक स्त्रीच्याबाबतीत हा दिवस वेगळा असू शकतो)

२. स्त्रीबीज बीजनलिकेमध्ये शिरते. या बीजामध्ये फलित होण्याची क्षमता साधारणत: २४ तासांपर्यंत असते. या कालावधीत जर शुक्रजंतूशी जर मिलन झाले तर गर्भधारणा होण्याचा संभव असतो.

३. शारीरिक संबंधांनंतर शुक्रजंतू गर्भाशयातून बीजनलिकेत शिरतात.

४. या गर्भनलिकेत स्त्रीबीजाच्या चारही बाजूंनी शुक्रजंतू चिकटतात. एका रासायनिक प्रक्रियेमुळे स्त्रीबीजाच्या सभोवताली असलेल्या Zonapellucida या आवरणामध्ये छेद निर्माण होतो व शुक्रजंतूमधील केंद्रक म्हणजे गुणसूत्र असलेला भाग स्त्रीबीजाच्या आत शिरतो.

५. त्याच वेळी असे काही बदल होतात, ज्यामुळे एकापेक्षा जास्त शुक्रजंतू स्त्रीबीजाच्या आत शिरू शकत नाहीत. अश्याप्रकारे फलित झालेल्या स्त्रीबीजाला 'Zygote' असे म्हणतात. ही बाळाच्या अस्तित्वाची पहिली खूण असते . यानंतर गर्भारपणाला सुरवात होते.अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा 

गर्भधारणेसाठी योग्य काळ कोणता

१. ओव्हूलेशन काळ महत्वाचा

सर्वसाधारणपणे एका निरोगी महिलेची तिच्या ओव्हूलेशऩच्या काळात सहजपणे गर्भधारणा होऊ शकते. मासिक पाळीची कालावधी हा साधारणपणे २८ दिवसांचा असतो. (मासिकपाळीचा पहिला दिवस पकडला तर १० ते १६ या दिवसात ओव्हूलेशऩ होते )ओव्हूलेशऩ साधारणपणे १४ व्या दिवशी सुरू होते. अंडाशयाद्वारे सोडलेली अंडी फॅलोपीयन ट्यूबमध्ये जाते. आणि तिथे ते फलीत होते. गर्भाशयाच्या भिंतीवर त्याचे प्रत्यारोपण होते. आणि तुमच्या गर्भाशयात बाळाची वाढ सुरू होते.

२. शारीरिक संबंधांनंतर पुरूषांचे शुक्राणू महिलांच्या शरीरात तीन दिवसांपर्यंत टिकून राहू शकतात. पण फळाचं कालवधी मात्र फक्त १२ ते २४ तासांचाच असतो. त्यामुळे तुमची पाळी संपल्यानंतर शक्य होईल तेवढ्या लवकर प्रणय होणे आवश्यक आहे. या काळात शारीरिक संबंध ठेवल्यास गर्भधारणा होण्याची शक्यता सर्वाधिक असते.

ओव्हूलेशन होत आहे कसे ओळखावे

१. ओटीपोटात वेदना जाणवणे

२. शरीराचे तापमान वाढणे ते ०.४ ते १.० डिग्री इतके वाढते.

३. या काळात योनीस्त्राव प्रमाण वाढते आणि स्त्राव स्वच्छ आणि शुभ्र असतो.

वरील साधारण लक्षणे ओव्हूलेशनच्या काळात जाणवतात.

गर्भधारणेवर खूप परिणाम करणाऱ्या गोष्टी 

प्रात्येक स्त्रीच्या शरीराची रचना वेगळी असते आणि प्रत्येक स्त्री ही नैसर्गिकरित्या गर्भधारणेसाठी वेगळा वेळा घेतात. ज्या जोडप्यांना अपत्य प्राप्तीस काही समस्या निर्माण होत असतात. त्यांची देखील कारणे वेग-वेगळी असतात. पुढील काही गोष्टी गर्भधारणेवर खूप परिणाम करतात. त्या कोणत्या ते आपण पाहणार आहोत.

१. तुमचं वय

हे असे काहीतरी आहे जे आपण खरोखर नियंत्रित करू शकत नाही, परंतु निश्चितपणे आपल्या गर्भधारणेच्या शक्यतांवर याचा प्रचंड प्रभाव आहे. वयाचा स्त्री बीजांची संख्या आणि आणि त्याच्या गुणवत्तेवर प्रभाव असतो. जसे वय वाढते तसतसे ही गुणवत्ता आणि संख्या कमी होते.गर्भधारणेसाठी स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात उत्तम काळ म्हणजे. वयाचे २० ते ३० वर्षे. वयाच्या ३० व्या वर्षानंतर प्रजनन क्षमता कमी होण्यास सुरुवात होते, आणि 35 वर्षानंतर प्रजनन क्षमता फारच कमी होते.

२. समागमाचे प्रमाण

तुम्हांला या गोष्टीबाबत आश्चर्य वाटण्याची शक्यता आहे, परंतु गरोदर राहण्यासाठी तुम्हांला नियमित समागम करण्याची गरज आहे. आठवड्यतून २ ते ३ वेळा समागम करा. मासिकपाळी नंतर ओव्हुलेशनच्या दिवसांमध्ये, निश्चितपणे समागम करणे गरजेचं आहे . यामुळे गर्भधारणा होण्याची शक्यता नक्कीच वाढेल.

३. आरोग्य आणि जीवनशैली

जास्त वजन किंवा कमी वजन असणे आपल्या हे गर्भधारणेवर परिणाम करू शकते. ते आपल्या हार्मोन्सला प्रभावित करतात. आणि म्हणूनच याचा स्त्रीबिजांचा देखील परिणाम होतो. नियमितपणे व्यायाम आणि वेळेवर संतुलित आहार आणि पुरेशी झोप या साध्या दिनक्रमामुळे आपल्या प्रजननक्षमतेत सुधारणा होऊ शकते.

गर्भधारणा होण्यासाठी धुम्रपान,मद्यपान या सारखी आणि इतर व्यसने टाळणे आवश्यक आहे. मद्यपानामुळे स्त्रीबीज आपल्या तग धरण्याची क्षमता गमावतात आणि ही गोष्ट केवळ महिलांनाच मर्यादित नाही, धुम्रपान आणि मद्यपानामुळं पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर देखील वाईट परिणाम होतो.

४. प्रजनन क्षमता समस्या

जर एखादे जोडपे बराच काळ प्रयन्त करून देखील त्यांना अपत्यप्राप्ती होत नसेल तर, कदाचित त्यांच्या मध्ये काही प्रजनन क्षमतेविषयी काही समस्या असण्याची शक्यता असते. कदाचित पुरुषाचा स्पर्म काऊंट किंवा त्याची गुणवत्ता बाबत काही समस्या असू शकते. किंवा स्त्रियांमध्ये पीसीओसी सारखी समस्या असण्याची

५. थाइरॉईड

महिलांमध्ये थायरॉईची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. हायपो आणि हायपर या दोन्ही प्रकारच्या थायरॉड असणाऱ्या महिलांमध्ये प्रजनन क्षमतेच्या बाबत समस्या निर्माण होऊन गर्भधारणा होण्यास समस्या निर्माण होते. तसेच गरोदर असताना देखील थायरॉईडची समस्या निर्माण होऊ शकते अधिक माहितीसाठी 

गर्भधारणेसाठी उपलब्ध पर्याय

१. आय व्ही एफ

नैसर्गिक गर्भधारणेमधून मातृत्व मिळण्याची आस संपते तेव्हा प्रगत तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते. त्यातील महत्त्वाचे आणि यशस्वी तंत्रज्ञान म्हणून आपण आयव्हीएफ( In Vitro Fertilization ) अर्थात टेस्ट ट्यूब बेबी कडे पाहू शकतो. ज्या महिलांना गर्भधारणेत अडचणी येतात किंवा गर्भधारणा होऊ शकत नाही किंवा पुरुषांमध्ये प्रजनन क्षमता नसल्यास या तंत्रज्ञानाचा फायदा करून घेता येतो. या तंत्राचा शोध लागून सुमारे ४० वर्षाहून अधिक कालावधी लोटला आहे. जगभरात या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

टेस्ट ट्यूब बेबी किंवा आयव्हीएफ तंत्रज्ञान म्हणजे काय

स्त्रीच्या शरीरात तयार होणारी बीजांडे आणि पुरुषाच्या वृषणात तयार होणारे शुक्राणू यांचे मीलन स्त्री शरीराच्या आत न होता बाहेर प्रयोगशालेत केले जाते. यामध्ये स्त्रीच्या बीजांडनिर्मितीचा अभ्यास करुन जास्त बीजांडे तयार क़रण्याची औषधे इंजेक्शनच्या स्वरुपात दिली जातात. काही कालावधीनंतर ती स्त्री शरीरातून बाहेर काढून पुरुषाच्या वृषणात तयार होणारे शुक्रजंतु यांचे मील घडवून आणले जाते. त्यानंतर भ्रूण २ ते ५ दिवस प्रयोगशाळेत वाढवले जाते. त्यातील उत्तम गुणवत्तेचे भ्रूण स्त्री शरीरात सोडले जाते. त्यानंतर पुन्हा या तंत्राने गर्भधारणा झाली आहे की नाही हे तपासले जाते. याची यशस्विता अधिक आहे.

२. सरोगसी (सरोगेट आई )

सरोगेट या शब्दाचा अर्थ आहे पर्याय आणि सरोगेट माता म्हणजे अशी स्त्री जी मुल न होऊ शकणा-या जोडप्यांसाठी त्यांचे बाळ स्वत:च्या गर्भाशयात वाढवते. मुख्यत्वे हा पर्याय काही कारणाने गर्भशयासंबंधी आजार किंवा मुल हवे असलेल्या स्त्रीला गर्भधारणा करण्याची क्षमता नसल्यास वापरण्यात येते. परंतु हल्ली अनेक कारणां या पद्धतीचा वापर करण्यात येतो.

सरोगसी चे प्रकार

१. सरोगेट आईच्या बिजाद्वारे (पारंपरिक पद्धत )

या पद्धतीत सरोगेट मातेशी मूल हवे असलेल्या जोडप्यातील पुरुषाचा समागम जाणीवपूर्वक कृत्रिमपद्धतीने घडवून गर्भधारणा करण्यात येते. या पद्धतीला पारंपरिक सरोगसी पद्धत देखील म्हणतात.

२. मूल हवे असलेल्या स्त्रीचे स्त्रीबीजाद्वारे

या बाळ हवे असलेल्या स्त्रीचे स्त्रीबीज व तिच्या नव-याचे शुक्राणू यांचे आयव्हीएफ या पद्धतीने मिलन घडवून तो गर्भ सरोगेट मातेच्या गर्भाशयात सोडण्यात येतो अथवा त्यास्त्रीचे स्त्रीबीज व तिच्या नव-याचे शूक्राणू जीआयएफटीGamete Intra-Fallopian Transfer या पद्धतीने सरोगेट मातेच्या गर्भाशयात सोडण्यात येतात त्यामुळे सरोगेट मातेच्या गर्भाशयात गर्भधारणा होते. जर मूल हवे असलेल्या स्त्रीचे स्त्रीबीज वापरणे शक्य नसेल तर एग डोनरकडून स्त्रीबीज घेण्यात येतात.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon