Link copied!
Sign in / Sign up
38
Shares

गरोदर असतांना पायावर सूज का येते आणि त्यावर उपाय


आई होणे जितके आनंददायी असते तितकेच गरोदरपण अवघड असते. गरोदरपणाच्या साधारणतः पाचव्या ते आठव्या महिन्यापासून अनेक गर्भवती स्त्रियांना पायावर सूज येते. काही जणींना तर चालणे देखील मुश्कील होते. ही सूज येणे बाळासाठी किंवा आईसाठी अपायकारक अजिबात नसते. बराच काळ उभे राहिल्याने किंवा काही जास्तीचे चालणे झाल्यास पायावर सूज येते. अशी सूज हातांवर देखील येऊ शकते. ही एक सामान्य बाब आहे. प्रसूती नंतर सूज आपोआप जाते.

या काळात बाळाच्या वाढीसाठी तुमचे शरीर ५०% जास्त रक्त तयार करत असते. वाढलेले वजन आणि त्यात जास्त वेळ उभे राहिल्याने शरीराच्या खालच्या भागात रक्तप्रवाह बदलतो याचाच परिणाम म्हणून पायावर सूज येऊ शकते. तसेच या काळात तुमचे शरीर पाणी धरून ठेवते म्हणून देखील सूज येते.

जर ही सूज तुमच्या एकाच पायावर आली असेल किंवा चेहेऱ्यावर अथवा डोळ्याखाली सूज आली असेल किंवा अचानकपणे खूप सूज आली असेल तर त्वरित डॉक्टरांना कळवा.

सूज कमी करण्यासाठी उपाय.

१. जास्त वेळ एका जागी उभे रहाणे टाळा.

गरोदरपणात मातेचे वजन वाढलेले असते. या वजनाचा भार एकाच जागी उभे राहिल्याने पायांवर पडू शकतो. शरीरात रक्त जास्त असल्याने आणि पायांवर जोर आल्यामुळे तिथे रक्तप्रवाह सुरळीत होत नाही ,परिणामी पाय सुजतात. पायाची मनगटे देखील जास्त काळ उभे राहिल्याने दुखू शकतात. एकाच जागी जास्त वेळ उभे राहू नका. शक्य असल्यास बसूनच काम करा.

२. पाय वरती ठेवून बसा.

पायावर सूज आलेली असतांना जर तुमचे काम तुम्हाला करायचे असेल तर शक्यतो बैठे काम करा आणि समोर एक खुर्ची किंवा टेबल ठेवून त्यावर सरळ पाय ठेवा. अशाने रक्तप्रवाह समांतर होईल आणि सूज हळू हळू कमी होईल. पायात घट्ट मोजे किंवा शूज घालणे टाळा. तुम्हाला कम्फरटेबल असेल अशाच चपला किंवा शूज वापरा. शक्यतो पायांवर जोर येणार नाही असे बघा.

३. चालण्याचा ब्रेक.

जास्त वेळ एकाच स्थितीत बसल्यास सुद्धा सूज येऊ शकते. तुमच्या कामातून छोटे छोटे ब्रेक घ्या आणि थोडे थोडे चाला. चालण्याने तुमच्या शरीराच्या खालच्या भागात रक्त जमा होऊन बसणे टळेल. चालण्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो. याने सूज कमी होण्यास मदत होईल. बसतांना देखील एकावर दुसरा पाय ठेवून बसू नका. दोन्ही पाय समांतर ठेवा.

 

४. भरपूर पाणी प्या .

पाणी हे या काळात तुमच्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असते. बाळाची वाढ होण्यासोबतच शरीरातून जास्तीचे पाणी काढून टाकण्याचे काम देखील पाणीच करते. जेंव्हा तुम्ही कमी पाणी पिता तेंव्हा शरीराला पाण्याच्या कमतरतेचे संकेत जातात आणि शरीर पाणी धरून ठेवते. यामुळे हातांवर आणि पायावर सूज येऊ शकते. भरपूर पाणी प्या म्हणजे शरीरात ‘वाॅटर रिटेन्शन’ होणार नाही. सोबतच कॉफी पिणे, जंक फूड खाणे आणि तेलकट पदार्थ खाणे टाळा. हे पदार्थ पाणी धरून ठेवतात.

५. व्यायाम.

गरोदरपणात देखील नियमित व्यायाम करणे फायद्याचे आहे.

१. दोन्ही पायाची मनगटे एक एक करून घडाळ्याच्या दिशेने १० वेळा गोलाकार दिशेने फिरवा.

२. दोन्ही हात समोर धरून हाताची मनगटे घडाळ्याच्या काट्याच्या दिशेने गोलाकार दिशेत फिरवा.

३. हाताचे खांदे मोकळे करण्यासाठी खांदे गोलाकार दिशेने हात उंच करून फिरवा.

तुम्हाला घरगुती व्यायाम करणे सहज सोप्पे आहे. व्यायाम करतांना तुम्ही शरीराच्या कोणत्याही भागावर जास्त ताण देत नाही आहात याची दक्षता घ्या. थोड्या कोमट पाण्यात पाय बुडवून ठेवणे सुद्धा तुम्हाला मदत करेल.   

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon