Link copied!
Sign in / Sign up
7
Shares

गरोदरपणात खूप गोड पदार्थ खाण्याचा बाळावर काही परिणाम होतो का?

गर्भवती झालाय? अभिनंदन! पण थांबा. आता हे होईल- तुम्ही डॉक्टरकडे जाणार; पालक बनण्याच्या नुसत्या कल्पनेनेही तुम्हाला आनंदाचे भरते येईल; तुमच्या आजूबाजूला अतिशय जल्लोषाचे वातावरण निर्माण होईल! बाळ होणे हा खूप दीर्घ काळासाठी तुमच्या आयुष्याचा परमोच्च बिंदू बनून जातो. तुमचे बाळंतपण हे तुम्ही विचारही केला नसेल; अशा नव्या शक्यतांचे दरवाजे उघडून देते आणि या अद्भुत प्रवासात त्या सर्वांचा तुम्हाला प्रत्यय येत राहील.

आता गरोदर काळात तुम्ही भरपूर चिंतित राहाल आणि विचार कराल की, तुम्ही दररोज जसे वागता; त्याचा नकारात्मक परिणाम बाळावर होऊ शकतो. सामान्यतः तुम्ही याबाबत डॉक्टरांना विचारता; पण गर्भारकाळात डॉक्टरांना कोणती काळजी घ्यावी हे विचारणे वेगळे आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक लहानशा गोष्टींबाबतही विचारणे वेगळे! ह्या 'लहानशा बाबी' कधीच संपणाऱ्या नसतात आणि त्या सर्वांबाबत डॉक्टरांना भंडावून सोडणे उचित नसते. तथापि असे प्रश्न हे भरपूर चिंताजनक असतात.

अशाच चिंताजनक प्रश्नांपैकी एक म्हणजे 'गरोदरपणात खूप गोड पदार्थ खाण्याचा बाळावर काही परिणाम होतो का?'

गर्भारकाळात खायची सर्वात जास्त इच्छा होते, अशा पदार्थांपैकी एक म्हणजे गोड पदार्थ! थोड्याशा प्रमाणात ते खाण्यात काही धोका नाही; पण अतिप्रमाणात सेवन हे आई आणि बाळ दोघांवरही नकारात्मक परिणाम करते.

या विषयाबाबत काही ठळक मुद्दे म्हणजे:

१) गोड पदार्थांच्या सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. याचा गर्भारकाळातील वजन वाढण्याचा थेट संबंध आहे.

२) गर्भारकाळात साखरेचे पदार्थ खाण्याने लठ्ठ मुले होण्याची शक्यता असते.

३) आहारात अतिप्रमाणात साखरेने 'प्रि-एक्लॅम्पशिया' होण्याचा धोका वाढतो.

४) अतिप्रमाणात साखरेचे पदार्थ खाण्याने लवकर प्रसूतीवेदना होऊ शकतात.

५) कर्बोदके आणि साखर असलेले पदार्थ खाण्याने सकाळचा थकवेपणा वाढण्याची शक्यता वाढते.

६) साखरेच्या पदार्थांच्या सेवनामुळे बाळाच्या रक्तवाहिन्यांच्या रचनेवरही परिणाम होतो आणि त्यांचे हृदयदेखील बंद पडू शकते. (अगदी आठ वर्षे वय असतानाही!)

७) जर तुम्ही जास्त साखरेचे सेवन केले; तर तुमच्या बाळाला मेटाबॉलिक सिण्ड्रोम आणि मधुमेह होण्याचा धोका वाढतो.

जेव्हा तुम्हाला गोड पदार्थ खायची इच्छा होऊ लागेल; तेव्हा कृपया ती इच्छा टाळायचा प्रयत्न करा. बहुतांशी वेळा तुम्ही अशा इच्छा तुमच्या बाकी आवडत्या पदार्थांचा आस्वाद घेऊन टाळू शकता.

येथे काही पर्याय आहेत: , फळांचे रस. तुम्ही स्ट्रॉबेरी, केळी अशी फळे 'पीनट बटर'सोबत आजमावू शकता.

गरोदरपणाच्या नऊ महिन्यांमध्ये तुमच्यावर खूप तणाव येईल- मानसिक (तुमच्या दैनंदिन कृतींवर सतत मर्यादा ठेवल्याने) आणि शारीरिकही (शक्ती खर्च झाल्यामुळे आणि दैनंदिन कृती करताना वाढलेले वजन सांभाळल्यामुळे)! आम्ही तुमचा त्याग समजू शकतो आणि अशी आशा करतो की तुमच्या गर्भार काळात आमची थोडीफार सहाय्यता झाली असेल!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon