Link copied!
Sign in / Sign up
13
Shares

गरोदरपणात अति पाणी पिणे चिंतेचे असते का?

दिवसभरात आपल्या गरजेपुरते पाणी पिणे सर्वांसाठी महत्वाचे असते. हे पाणी पिण्याचे महत्व गरोदरपणात अजून वाढते. गर्भवती स्त्रीने स्वतःचे शरीर हायड्रेट ठेवणे तिच्यासाठी तसेच बाळासाठी देखील अतिशय गरजेचे असते. याद्वारे तुम्ही खात असलेल्या अन्नातील पोषक घटक बाळापर्यंत पोहोचतात जे बाळाच्या उत्तम वाढीसाठी उपयोगी ठरते.

जर तुम्ही आई होणार असाल तर तुम्ही दिवसभरात किती पाणी प्यावे आणि तुमच्या शरीराला असणारी पाण्याची नेमकी गरज जाणून घ्या.

खूप पाणी पिणे असे काही नसते.

तुम्ही गरोदर असाल तर खूप पाणी पिण्यासारखे काही नसते. म्हणजे भरपूर पाणी पिण्याचा सल्ला सामान्यतः दिला जातो, यामुळे पाणी जास्त होत नाही. अनेकजणींना पाणी शरीरात साठून वतर – रीटेन्शन होण्याची भीती वाटते. परंतु मुळात पाणी जास्त पिल्याने शरीरात पाणी जास्त होणे असे काही नसते. तुम्हाला हवे तेवढे पाणी प्या.

काही महिलांना वाटते की जास्त पाणी पिल्याने गर्भातील अॅम्निओटिक फ्ल्युड म्हणजेच गर्भाच्या पिशवीतील पाण्याच्या पातळीत अचानक वाढ होते. वैद्यकीय शास्त्रात यास ‘ पॉलीहायड्रामिनोस’ असे म्हणतात. जास्त पाणी पिल्याने अॅम्निओटिक फ्ल्युड मध्ये गरजेपेक्षा जास्त वाढ होत नाही. एखाद्या जेनेटिक समस्येमुळे किंवा प्लासेंटा मध्ये असणाऱ्या समस्येमुळे हे फ्ल्युड वाढू शकते. कधी कधी हे फ्ल्युड वाढण्याचे कारण आईला मधुमेह असण्यामध्ये दडलेले देखील असू शकते.

१. पाणी पोषाकत्वे शोषून घ्यायला मदत करते.

पाणी हे तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी अतिशय महत्वाची भूमिका बजावते. तुम्ही खात असलेल्या अन्नातून तुमच्या शरीराला मिळणारे पोषक द्रव्य पाणी शरीरातील पेशींना आणि बाळापर्यंत पोहोचवते. आईला या काळात जास्त शक्तीची गरज असते आणि शरीरात रक्ताची निर्मिती देखील वाढते ज्यात पाण्याच्या खूप महत्वाचा भाग असतो. पाणी पिल्याने बाळाच्या वाढीत अडथळे येत नाहीत आणि त्याच्या वाढीसाठी लागणारे पोषकत्वे त्याला योग्य प्रमाणात मिळतात.

२. पाणी युरीनरी ट्रॅक इन्फेक्शन पासून बचावते.

केवळ बाळापर्यंत सर्व पोषकद्रव्ये पोहोचवणेच नव्हे तर तुमच्या शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्याचे काम देखील पाणीच करते. गरोदर स्त्रिया लघवी जास्त प्रमाणात करतात त्यामुळे त्यांच्या किडनी आणि मूत्राशयाच्या योग्य कार्यासाठी शरीरात पुरेसे पाणी असणे गरजेचे ठरते. यामुळे बाळाच्या किडनीवर परिणाम होत नाही. उलट पाणी पिल्याने युरीनरी ट्रॅकचे इन्फेक्शन होत टळते , जे गरोदर स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येते. पाण्यामुळे तुम्हाला बद्धकोष्टतेचा त्रास सुद्धा होणार नाही.

३. घेरी येणे आणि थकव्यापासून बचाव.

गरोदर असतांना तुम्हाला थकल्यासारखे वाटणे साहजिक आहे. असे असतांना पाणी कमी पिल्यास तुमच्या थकवा अजून वाढू शकतो. शरीरात पाणी कमी झाल्यामुळे डीहायड्रेशनची समस्या उद्भवते. यातून घेरी येणे, थकवा येणे, गळून जाणे अशा समस्या पुढे येतात. अनेक स्त्रियांना या काळात ‘मॅटेर्नल ओवरहिटिंग’ ची समस्या असते. म्हणजेच शरीराचे तापमान वाढते. पाणी भरपूर प्रमाणात पिल्यास तुम्ही तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रित करू शकता. त्यामुळे या काळात पुरेसे पाणी प्या.

४. पाण्यामुळे ‘अर्ली युटेरिन कॉन्ट्रॅकशन’ टळतात.

काही अभ्यासांमध्ये असे दिसून आले आहे की पाण्याच्या कमतरतेमुळे मातेला मुदतपूर्व कळा येऊ शकतात. पाण्याच्या कमतरतेमुळे अचानक कळा सुरु होऊ शकतात. आईच्या मनात यामुळे एक भीती बसते. प्रसूती योग्यरीत्या पार पडावी म्हणून तुम्ही पुरेश्या प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे.

५. पाणी पिल्याने गर्भपिशवीतल्या पाण्याची पातळी वाढते.

 

अॅम्निओटिक फ्ल्युड हा बाळाच्या वाढीसाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे. याने बाळाचे रक्षण होते आणि सोबतच बाळाला गर्भात हालचाल करण्यासाठी पुरेशी जागा देखील मिळते. मातेच्या शरीरातील पाणी कमी झाल्यास या अॅम्निओटिक द्रवात देखील कमतरता येऊ शकते. यासाठी आईने भरपूर पाणी प्यायला हवे जेणेकरून या द्रवाची पातळी योग्य प्रमाणात राहते आणि बाळाच्या वाढीत अडचणी येत नाहीत.

६. गरोदरपणात किती पाणी पिणे गरजेचे असते.

या काळात तुम्ही भरपूर पाणी पिण्याचे सुचवले जाते. सामान्यतः एक व्यक्ती दिवसातून जितके पाणी पिते त्यापेक्षा जास्त पाणी गरोदर स्त्रीने पाणी प्यावे. ही माहिती पुरेशी नसली तरीही साधारणतः १२-१३ ग्लास पाणी एका दिवसात तुम्ही पिणे अत्यंत गरजेचे आहे.

काही तज्ञांच्या मते तुम्ही दररोज ३ लिटर पाणी प्यावे. या ३ लिटर मधील जवळपास १.५ लिटर पाणी हे प्रत्यक्ष पिण्यातून आणि उर्वरित पाणी ज्यूस, दुध, फळे व द्रव पदार्थ यातून घ्यायला हवे.

काही स्त्रियांसाठी एकदम पाणी पिण्यात एवढी वाढ करणे शक्य नसेल तर तुम्ही एका वेळी एक ग्लास वाढून सुरुवात करू शकतात. रोज दिवसातून थोडे थोडे करून पाणी प्या. हळु हळू तुमचे प्रमाण वाढवा. तुम्हाला रात्री उठून लघवीसाठी जावे लागणार नाही असे बघा. तुमची ही सवय तुम्हाला खूप मदत करेल.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon