Link copied!
Sign in / Sign up
0
Shares

कैरीचे काही चटकदार पदार्थ

कैरीचा तक्कु 

साहित्य: एक कैरी, दोदोन कांदे , लाल तिखट, मीठ, गूळ, दोन चमचे तेल,अर्धा चमचा मेथ्या, अर्धा चमचा मोहरी, दोन किंवा आवडीनुसार चिमूट हिंग

कृती:

१. कैरी आणि कांदे दोन्ही किसून घ्या.

२. या किसलेल्या मिश्रणात चवीप्रमाणं मीठ, बारीक चिरलेला गूळ आणि लाल तिखट घाला आणि नीट मिक्स करून घ्या. 

३. नंतर  तेल तापवून मोहरी तडतडवून घ्या. नंतर  मेथ्या तळून घ्या  मेथ्या लालसर होऊ लागल्या की हिंग घाला आणि नंतर हि फोडणी उतरवून घ्या आणि थोडी कोमट झाल्यावर कांदा  कैरीच्या मिश्रणावर घाला. 

हा तक्कु फ्रीज मध्ये ठेवला असता ४-५ दिवस टिकतो 

मेथांबा

 

साहित्य

कपभर साल काढलेले कैरीचे तुकडे (आवश्यकतेनुसार )

१/२ कप गूळ

१/२ टिस्पून मेथी दाणे

१ टिस्पून तेल

१/८ टिस्पून मोहोरी

१/४ टिस्पून हळद

१/२ टिस्पून लाल तिखट

मिठ

कृती:

लहान  एका कढईत किंवा पातेल्यात लहान पातेल्यात तेल गरम करावे, मेथी दाणे घालून परता. आणि  नंतर  मेथीदाणे परतले कि मोहोरी, हिंग, हळद, आणि लाल तिखट घालून फोडणी करून घ्या . त्यानंतर लगेच त्यात  कैरीच्या फोडी घालून मंद आचेवर कैरी मऊ होई पर्यंत  वाफ काढावी.हवे आल्यास पाणी घालावे आणि  चवीपुरते मिठ घालावे.

कैरीच्या फोडी शिजल्या का बघावे आणि त्यानंतर त्यात  कि त्यात गूळ आणि थोडे पाणी घालावे. त्यानंतर गॅस बारीक करून ते मिश्रण आवडीनुसार घट्ट पातळ होई पर्यंत गॅस चालू ठेवावा.

कैरीची झटपट लोणचे 

साहित्य

कैऱ्या आवश्यकतेनुसार ,मीठ. लाल तिखट, मोहरीपूड  एक-दोन चमचे तेल, मोहरी 

कृती

१. कैरीचे तुकडे करून घ्या. त्यात मीठ आणि तिखट घाला आणि नीट कालवून घ्या. 

२. आवडीनुसार मोहरीची पूड घाला.किंवा वरून मोहरीची  फोडणी थंड झाल्यावर घाला 

झटपट लोणचे तयार हे लोणचे तात्पुरते ४-५ दिवस टिकते त्यामुळे कैऱ्यांच्या मोसमात  हे लागेल तसे करत जावे.

 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon