Link copied!
Sign in / Sign up
7
Shares

काही सॅलाडच्या रेसिपी ज्या वजन घटवण्यास उपयुक्त ठरतील


पालक आणि व्हेजिटेबल सॅलड .

पालक हा सॅलड मध्ये टाकण्यासाठी एक उत्तम आणि पौष्टिक असा घटक आहे. पालकासोबत अजून काही भाज्या या सॅलड मध्ये टाकून कमी कॅलरीज असणारे, वजन घटवण्यासाठी उत्तम आणि भरपूर विटामिन्स असणारे सॅलड आपण तयार करू शकतो.

साहित्य:

१/२ पालकाची जुडी, १ सिमला मिरची, १ मध्यम आकाराचा टमाटा, १ मध्यम आकाराची काकडी, १/२ कप खिसलेली कोबी, १/२ कप चिरलेला कांदा, १ चमचा आॅलिव्ह ओईल, मीठ आणि चवीनुसार काळी मिरी.

कृती:

१. पालक चिरून त्याचे छोटे छोटे काप करून घ्या. तुम्हाला कच्चा पालक आवडत नसेल तर तुम्ही २-३ मिनिटे पालक पाण्यात उकळून घेऊ शकता.

२. याचप्रकारे सिमला मिरची, काकडी आणि टमाटा सुद्धा चिरून घ्या.

३. सर्व भाज्या एका बाउल मध्ये एकत्र करून त्यात आॅलिव्ह ओईल, मीठ आणि काळी मिरीपूड गरजेनुसार टाका.

 संध्याकाळी नाश्त्याला तुम्ही हे सॅलड पोटभर खाऊ शकता.

प्रमाण: एका वेळी २ बाउल सॅलड खाणे पुरेसे आहे.

 काकडी आणि टोमॅटो  सॅलड 

ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी डॉक्टर हे सॅलड खाण्याचा सल्ला देतात. यात २ फळभाज्यांचा समावेश असून हे एक सोप्पे आणि सर्वांचे आवडते सॅलड आहे.

साहित्य: १. मध्यम आकाराची काकडी, १ मध्यम आकाराचा टमाटा, एक चमचा लिंबाचा रस, मीठ आणि काळी मिरेपूड चवीसाठी.

कृती: टमाटे आणि काकडी सम प्रमाणात कापून घ्या. ह्याचे मिश्रण करून त्यात लिंबाचा रस, मिठ आणि काळी मिरेपूड चवीनुसार टाका.

सॅलड खाण्याची वेळ: हे सॅलड तुम्ही तुमच्या मुख्य जेवणाच्या आधी खाऊ शकता. याने पोट थोडे भरेल आणि जेवतांना जास्तीचे जेवले जाणार नाही. वजन कमी करण्यासाठी हे सॅलड उत्तम आहे.

प्रमाण: एका वेळी २ -३ बाउल सॅलड तुम्ही खाऊ शकता.

कलिंगड आणि काकडीचे सॅलड .

फळभाजी आणि फळ यांचे मिश्रण असलेले हे सॅलड तुम्हाला फ्रेश करण्यासाठी उत्तम आहे. तुम्ही हे सॅलड रोज खाऊ शकता आणि याने तुम्ही हायड्रेट देखील राहाल.

साहित्य: एक कप चिरलेले कलिंगड, १ कप चिरलेली काकडी, चवीनुसार मीठ आणि काही डाळिंबाचे दाणे.

कृती:

१. कलिंगडातल्या बिया काढून घ्या.

२. काकडी, कलिंगड आणि दालीम्बाचे दाणे एका बाउलमध्ये एकत्र करा .

३. या मिश्रणात चवीनुसार मीठ किंवा चाट मसाला टाकून घ्या.

सॅलड खाण्याची वेळ : हे सॅलड अगदी हलके असल्यामुळे तुम्ही दुपारच्या जेवणावेळी किंवा संध्याकाळी नाष्टाला खाऊ शकता.

प्रमाण: हे सॅलड कॅलरीज मध्ये कमी असते त्यामुळे तुम्ही एका वेळी २-३ बाउल खाऊ शकता.

वजन घटवण्यासाठी फळांचे सॅलड

तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात फळांच्या सॅलड चा समावेश सहज करू शकता. वजन कमी करण्यासाठी हा एक छान उपाय आहे. तुम्ही तुमच्या नाश्त्याच्या जागी हे सॅलड खाऊ शकता. इथे काही अशाच सोप्प्या फ्रुट सॅलड च्या रेसिपी दिल्या आहेत, ज्या तुम्ही रोजच्या आहारात घेऊ शकता.

सफरचंद, पिअर आणि संत्री सॅलड .

साहित्य : १ लहान सफरचंद, १ मध्यम आकाराचे पिअर फळ, १ मध्यम आकाराची संत्री, १ चमचा डालिंबाचे दाणे आणि २ चमचे लिंबाचा रस.

कृती : सफरचंद आणि पिअर यांचे क्युब्सच्या आकारात सोयीनुसार काप करून घ्या. संत्रे सोलून त्यातील एक पाकळी बाजुला काढा आणि उर्वरित संत्र्याचे छोटे छोटे काप करून घ्या. या फळांचे काप एकत्र करून घ्या. या मिश्रणात लिंबाचा रस आणि डाळींबाचे दाणे टाका. संत्र्याच्या बाजूला काढून ठेवलेल्या पाकळीतून रस काढून घ्या आणि तो रस या मिश्रणात मिसळा.

हे सॅलड फ्रीजमध्ये गार होण्यास ठेवा. गार झाल्यावर हे सॅलड चविष्ट लागते.

सॅलड खाण्याची वेळ: तुमचा दिवस उत्साहाने सुरु करण्यासाठी सकाळी नाष्टाला तुम्ही हे सॅलड खाऊ शकता.

प्रमाण : या सॅलड मध्ये सायट्रस अॅसिड असणारी फळे जास्त असल्यामुळे तुम्ही दिवसातून एकदाच हे खाणे योग्य ठरेल. एका वेळी १-२ बाउल पुरेसे आहे.

अननस, डाळिंब आणि सफरचंदचे सॅलड .

डाळिंब आणि अननस या फळांमध्ये भरपूर प्रमाणात पोषकत्वे असतात. ही फळे वजन कमी करण्यास खूप उपयोगी ठरतात. यासोबत सफरचंद असल्यामुळे तुमचे पोट बराच काळ भरलेले राहील.

साहित्य: १/२ कप चिरलेले अननस, १ कप चिरलेले सफरचंद आणि १ कप डाळिंबाचे दाणे.

कृती : वरती दिलेले सर्व साहित्य, म्हणजेच फळांचे काप एका मोठ्या बाउल मध्ये एकत्र करा. यात तुमच्या आवडीनुसार वरून अननसाचा रस तुम्ही टाकू शकता. याने सॅलडला चव येईल.

सॅलड खाण्याची वेळ : हे सॅलड तुम्ही छोटी भूक भागवण्यासाठी म्हणजे नाश्ता म्हणून सकाळी किंवा संध्याकाळी खाऊ शकता.

प्रमाण: अननसात साखर जास्त असल्यामुळे दिवसातून १ वेळा हे सॅलड खाणे पुरेसे आहे.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon