Link copied!
Sign in / Sign up
12
Shares

कडधान्यांच्या काही रेसिपी


कडधान्ये म्हणजे झाडांच्या बिया ज्या खाण्यायोग्य असतात. मुग, मसूर, चना, हरभरे अशी अनेक कडधान्ये आपल्या आहारात आपण घेतो. कधी वरण म्हणून तर कधी मोड आणून या कडधान्यांचे सेवन घरोघरी केले जाते. यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असल्यामुळे आरोग्यासाठी आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी कडधान्ये उत्तम असतात.

लहान मुलांना वरणाचे पाणी पाजतात, यामध्ये डाळीचे गुणधर्म असतात. कडधान्ये शारीरिक वाढीसाठी उत्तम असल्यामुळे वाढत्या वयात मुलांना कडधान्ये भरपूर प्रमाणात खाऊ घालणे गरजेचे ठरते. आपण अशा काही कडधान्यांच्या रेसिपी पाहूयात ज्या अगदी सोप्प्या आणि खाण्यासही चविष्ट आहेत.

१. मोड आलेल्या मुगाचे डोसे.

मुग या कडधान्याला मोड आल्यानंतर त्याची पौष्टिकता अजून वाढते. मुग रात्रभर भिजवून त्यांना मोड येऊ द्या. आणि सकाळी नाश्त्याला तुम्ही हे टेस्टी आणि पौष्टिक डोसे करू शकता.

साहित्य

मोड आलेले मुग २ वाटी, आले-लसूण पेस्ट २ चमचे, २ चमचे तांदळाचे पीठ, चवीपुरते मीठ आणि गार्निश साठी चिरलेला कांदा आणि कोथिंबीर.

कृती 

मोड आलेले मुग, आले लसूण पेस्ट आणि मीठ एकत्र करून त्यात पाणी घाला आणि मिक्सर मध्ये वाटून घ्या. तुम्हाला जर तिखट करायचे असेल तर तुम्ही यात मिरचीचे काप सुद्धा टाकू शकता. हे मिश्रण एका बाउल मध्ये काढून त्यात २ चमचे तांदळाचे पीठ मिक्स करा. हे मिश्रण एकजीव करून यात वरून चिरलेली कोथिंबीर घाला.

या मिश्रणाला १०-२० मिनिटे सेट होण्यासाठी ठेवून द्या. या नंतर गरम पॅनवर तेल टाकून तुम्ही डोसे करू शकता. डोश्याला गार्निश करायचे असल्यास पॅनवर मिश्रण टाकल्यावर त्यावरून कांद्याचे बारीक काप पसरावा. डोसा कुरकुरीत होईल आणि टेस्टी लागेल. यासोबत टमाट्याचा सॉस तोंडी लावायला द्या.

टीप : तांदळाचे पीठ वरून टाकण्याऐवजी तुम्ही मुगासोबत अर्धी वाटी तांदूळ भिजत घालू शकता. या भिजलेल्या तांदळाला मुगासोबत वाटून घ्या.

२. चिलका रोटी.

ही रोटी उत्तर भारतात लोकप्रिय आहे. बनवायला सोप्पी आणि रोजच्या जेवणातील पोळीपेक्षा वेगळी आणि पौष्टिक अशी चिलका रोटी तुम्ही नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या हलक्या जेवणासाठी करू शकता.

साहित्य

१ कप तांदूळ, ३/४ कप चनाडाळ, पाणी, तेल आणि चवीपुरते मीठ.

कृती

तांदूळ आणि चनाडाळ ५-६ तासांसाठी पाण्यात भिजवून ठेवा. भिजलेले तांदूळ आणि चनाडाळ पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या. याची बारीक पेस्ट होईल एवढे पाणी घाला.

या पेस्ट मध्ये चवीपुरते मीठ घाला.

तवा गरम झाल्यावर त्यावर १ चमचा तेल पसरावा. तेलावर मिश्रण समान पद्धतीने पसरवा. ही रोटी एका बाजूने ब्राऊन होईपर्यंत भाजा. ही रोटी तुम्ही चटणी, सॉस किंवा लोणच्यासोबत खाऊ शकता.

मिक्स काठोळ

मिक्स काठोळ हा एक कडधान्यांच्या मिश्रणातून बनणारा पदार्थ आहे. प्रोटीन्सने भरपूर आणि अनेक प्रकारची कडधान्ये असल्याने हा चविष्ट लागतो.

साहित्य

३-४ प्रकारची तुमच्या आवडीची कडधान्ये (चवळी, चना, हरभरा, मुग इ.) २५० ग्राम, अर्धी वाटी टमाटर प्युरी, अर्धी वाटी कांद्याची प्युरी, २ मिरचीचे काप, १ चमचा हळद, १ चमचा धने पावडर, १ चमचा तिखट, १ चमचा जिरे, ३-४ लसणाच्या पाकळ्या, १/२ चमचा गरम मसाला, १/२ चमचा कसुरी मेथी, चिरलेली कोथिंबीर, चवीपुरते मीठ , शिजवायला पाणी आणि तेल.

कृती 

सर्वप्रथम कडधान्ये व्यवस्थित धुवून घ्या. एका पण मध्ये किंवा काढईत तेल गरम करून त्यात लसणाच्या पाकळ्या तांबड्या होईपर्यंत तळा. यात जिरे, मिरचीचे काप आणि हळद टाकून वरतून कांद्याची प्युरी मिक्स करा. कांद्याची प्युरी थोडी भूरकट होईपर्यंत मिश्रण हलवा. यानंतर टमाटर प्युरी घाला आणि मिश्रण एकजीव करून घ्या.

या सारणात धनेपूड, गरम मसाला, तिखट, कसुरी मेथी टाका आणि परत मिश्रण एकजीव करून घ्या. या सारणात आता मिक्स कडधान्ये टाका आणि मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. यात चवीनुसार मीठ आणि टमाट्याचा आंबटपणा झाकण्यासाठी छोटा गुळाचा खडा टाका. हे मिश्रण गरम होऊन सेट झाल्यानंतर यात वरतून १-१.५ कप गरम पाणी घाला आणि मिश्रण शिजू द्या. तुम्ही कढईवर किंवा पॅनवर झाकण देखील ठेवू शकता. कडधान्ये पूर्णपणे शिजली आहेत ते चेक करा आणि नरम झाली असल्यास गॅस वरून उतरावा.

टीप : यास कडधान्यांची उसळ असे देखील म्हणता येई. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखटाचे प्रमाण कमी-जास्त करून मिक्स काठोळ दही किंवा बटरसोबत खाऊ शकता.

कडधान्याचे सलाड

लहान मुलांना रोज काहीतरी नवीन खायला हवे असते. सलाड हा झटपट होईल आणि पौष्टिकही असेल असा पदार्थ आहे. वजन काही करण्यासाठी आपल्या आहारात प्रोटीन्स आणि फायबरचे प्रमाण जास्त हवे, या सलाडमध्ये तुमचे रोजचे प्रोटीन्सचे प्रमाण भरून काढण्याएवढे प्रोटीन्स आहेत. शिवाय या सलाडने पोट साफ होण्यासही मदत होईल.

साहित्य

१ वाटी मोड आलेले मुग, १ वाटी मोड आलेली मटकी, १/२ वाटी मोड आलेले हरभरे, १/२ वाटी मोड आलेली चवळी, १ मध्यम आकाराचा चिरलेला कांदा, १/२ लिंबू, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार तिखट आणि मीठ.

कृती 

 रात्रभर भिजवून मोड आणलेली कडधान्ये एका बाउल मध्ये एकत्र करा. त्यांचे पाणी काढून टाका. त्या बाउलमध्ये चिरलेला कांदा, तिखट, मीठ आणि कोथिंबीर घाला. वरून लिंबू पिळा. मिश्रण एकजीव करून सर्व करा कडधान्याचे सलाड.

टीप: तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ही कडधान्ये भिजवून फुगल्यावर त्यांना नंतर गरम कढईत भाजून देखील घेऊ शकता. याने क्रिस्पी चव येईल.   

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon