Link copied!
Sign in / Sign up
46
Shares

असे बनवा ज्वारीच्या पिठाचे नूडल्स

हि पाककृती  आम्हांला सौ अश्विनी समीर बाजी यांनी पाठवली आहे 

साहित्य 

ज्वारीचे पीठ - 1वाटी , हिंग - एक चिमूट,मीठ- गरजेनुसार, आलं लसूण पेस्ट-2 चमचे

तेल- 3 चमचे, मोहरी जिरे - 1 चमचा, हळद-1/2 चमचा, कढीपत्ता-10-12 पाने

कांदा बारीक कापलेला- 1, टोमॅटो बारीक कापलेला-1(आवडीनुसार भाज्या- गाजर,मटार,हिरवी शिमला मिरची),टोमॅटो सॉस-2चमचे, कोथिंबीर- सजावटीसाठी

कृती 

सर्वप्रथम ज्वारीच्या पिठात 1चमचा तिखट, चिमूटभर हिंग, मीठ आणि 1 चमचा तेल टाकून चकली च्या पिठाप्रमाणे मळुन घ्यावे.चकलीच्या सोऱ्यात मोठ्या शेवची डिश टाकून ज्वारीचे पीठ त्यात भरावे.

 

वाफावण्याचे पात्र असेल तर त्याच्या डिश ला तेल लावून घ्यावे आणि पात्रात पाणी उकळायला ठेवावे. पात्र नसेल तर कढई मध्ये पाणी उकळायला ठेवावे आणि त्यात खाली स्टॅण्ड ठेवावे आणि एका डिश ला तेल लावून घ्यावे .डिश मध्ये सोऱ्याने शेव पसरून घालावी. आणि झाकण ठेवून 10 मिनिटे वाफवून घ्यावी. वाफवून होईपर्यंत नूडल्स साठी फोडणी करून घ्यावी.

एका कढई मध्ये 2 चमचे तेल गरम करून त्यात जिरे मोहरी, कडीपत्ता,कांदा, आले लसूण पेस्ट,टाकावे. कांदा परतला कि त्यात टोमॅटो टाकून परतून घ्यावा. आवडीनुसार वर सामग्रीमध्ये दिलेल्या आणखी भाज्या घालू शकता. भाज्या परतून झाल्या की त्यात टोमॅटो सॉस आणि मीठ घालावे आणि ज्वारीचे वाफलेले नूडल्स टाकावे. 5-7 मिनिटे वाफवून घेऊन कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.(नूडल्स वाफले कि थोडे थंड होऊ देऊन आवडीनुसार बारीक करून मग फोडणीत टाकावे. आणि ज्वारीचे पीठ शक्यतो ताजे असावे म्हणजे नूडल्स चांगले होतील)

ब्रेकफास्ट किंवा संध्याकाळी नाष्टा म्हणून ही डिश उत्तम आहे..अगदी पौष्टिक आणि चविष्ट अशी रेसिपी आहे.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon