Link copied!
Sign in / Sign up
6
Shares

असा बनवा गाजराचा केक

ही  पाककृती आम्हांला पूजा शिंदे-दुधाळे यांनी पाठवली आहे 

किती व्यक्ती ही डिश खाऊ शकतील -५-६जण

ह्या पाककृतीला बनवायला किती वेळ लागतो-45 मिनिटे

साहित्य

६ इंचाचा बेकींग ट्रे, (किंवा डब्बा)

बटर पेपर ,

थोडेसे बटर,

अर्धा कप दूध ( रुम टेंपरेचर )

( ३-४ चमचे दूध जास्तीचे लागु शकते फार

घट्ट झाल्यास कंसिस्टन्सी अडजस्ट

करण्यासाठी )

पाव कप पीठी साखर,

पाव कप ब्राउन शूगर ,(असल्यास )

पाव कप तेल,

एक कप गव्हाचे पिठ (शक्यतो विकतचे

पिठ वापरा थोडे जाडसर चांगले )

१ चमचा (टि स्पून) खाण्याचा सोडा,

१ चमचा (टि स्पून) बेकींग पावडर,

पाव चमचा (टि स्पून) जायफळ किंवा

दालचिनी पावडर,

अर्धा कप कीसलेले गाजर,

पाव कप अक्रोड (बारीक तुकडे करुन घेणे)

कृती 

 

 सर्व प्रथम सर्व साहित्य तयार ठेवा, मग कुकर मध्ये मिठ टाकून (कुकर चा तळ कव्हर होईल एवढे ) त्यावर जाळी ची ताटली ठेवा आणि कुकर मध्यम आचेवर प्रिहीट व्हायला ठेवा. (कुकर च्या झाकणाला रिंग व शिट्टि लावु नये )

बेकिंग ट्रे च्या तळाशी ,तळाच्या आकारा चा बटर पेपर कापुन बटर च्या साह्याने चिटकवून घ्यावा आणि बेकींग ट्रे ला सगळी कडुन बटर लावुन घ्यावे.

एका भांड्यात दूध घ्या, त्यात पिठी साखर , ब्राउन शूगर आणि तेल घालुन चांगले ढवळुन घ्या.

एका ताटात कणीक ,सोडा आणि बेकींग पावडर चांगले एकत्र करुन जाड चाळणी ने चाळुन घ्यावे.

चाळलेले पीठ दुध ,साखर आणि तेलाचे जे मिश्रण केले आहे त्यात मिसळावे आणि मिसळताना एकाच डायरेक्शन मध्ये ढवळावे.

आता त्यात गाजराचा कीस आणि अक्रोड चे तुकडे टाकून चांगले एकत्र करून घ्यावे. फार घट्ट झाले असेल तर ,जे आपण जास्तचे दुध घेतले आहे ,ते टाकून कंसिस्टन्सी अडजस्ट करावी.

तयार बँटर बेकींग ट्रे मध्ये टाकुन कुकर मध्ये ठेवावे.

साधारण 35-40 मिनिटात केक तयार होईल.

सेंटर ला टुथप्रीक घालुन चेक करा ,टुथप्रीक क्लीन बाहेर आली म्हणजे केक व्यवस्थित बेक झाला .

बेकींग ट्रे बाहेर काढून त्याला 10 मिनिटे गार होवु द्यावे.

ट्रे च्या कडेने चाकु घालुन केक च्या कडा सोडवुन घ्या.

आता ट्रे वर एक ताटली झाकून ताटलीत ट्रे उलटावा व केक वरचा बटर पेपर काढून टाका.

तुमचा स्वादिष्ट केक तयार !!!!

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon