Link copied!
Sign in / Sign up
5
Shares

अशी करा पौष्टिक खपली गव्हाची खीर

 

ही पाककृती निहारिका आहुजा यांनी पाठवली आहे 

साहित्य 

पाऊण किलो खपली गहू , एक वाटी तांदुळ, काजु,बदाम, बेदाणे,वेलदोडापूड, आलं खलबत्यात चांगले कुठून घ्यायचे , गुळ आपल्या आवडीनुसार , खसखस दिड चमचा इ.

कृती 

गहू व तांदुळ कुकरला लावायच्या अगोदर गहू व तांदुळ गरम पाण्यात भिजवुन ठेवावे(10-15)मिनिटे म्हणजे खीर चांगली शिजते. आता ती कुकरमधे टाकून सात ते आठ शिट्टी करून घ्या . कुकर गार झाल्यावर ती खीर बाहेर काढून गुळ ,खोबरे ,काजू, बदाम, खसखस भाजून घेवून त्यामध्ये बेदाणे, खोबरयाचे पातळ काप टाकून नंतर त्यामध्ये आलं चेचून टाकणे नंतर वेलदोडापूड असे सर्व साहित्य एकत्र करून गॅसवर परत चांगली शिजवून घ्या. तुम्हाला खीर घट्ट वाटली तर त्यामध्ये गरम पाणी घालून चांगली शिजवून घ्या मस्तपैकी वरून तुप व दुध घालून खायला घ्या

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon