Link copied!
Sign in / Sign up
6
Shares

अपचनावरती घरगुती उपाय

अपचन होण्यास अनेक कारणे असतात. व्यक्तीच्या काही सवयीही अपचनास कारणीभूत असतात. अपचनाचा त्रास दूर करण्यासाठी आणि पोटाची भट्टी नीट राहण्यासाठी काही घरगुती उपाय आपण जरूर करु शकतो. शिवाय काही सवयी दूर ठेवू शकतो.

धूम्रपान थांबवा

पोटाची भट्टी बिघडण्यास सिगरेटही कारणीभूत ठरु शकते. सिगारेटच्या धुरात असलेली रसायने अन्ननलिका आणि पोट यांच्यातील स्नायूंच्या शिथिलीकरणास कारण ठरते त्यामुळे जठरातील आम्ल पुन्हा घशाशी येते. धूम्रपान सोडल्यास घशाशी येण्याचा हा त्रास कमी होण्याची शक्यता असते.

मद्यपान टाळा

अल्कोहोल किंवा मद्यपानामुळे पोटात अधिक आम्लाची निर्मिती होते त्यामुळे पोटाच्या अंतत्वचेला हानी होते. त्यामुळे अतिमद्यपान केल्याने अपचनाचा त्रास होऊ शकतो.

वजन कमी होणे

अति वजन असल्यास ते कमी करण्याचाही फायदा होतो त्यामुळेही अपचनाचा त्रास कमी होतो. कारण जास्त वजनामुळे पोटावर दाब पडतो त्यामुळे जठरातील अन्न पुन्हा अन्ननलिकेकडे वरच्या बाजूला ढकलले जाते. त्यामुळे जळजळ होते.

डोके आणि खांदे वरच्या बाजूला

झोपताना डोके आणि खांदे बाकी शरीरापेक्षा अधिक वर असल्यास फायदा होतो. त्यासाठी जास्त उशांचा वापर करावा. असे केल्याने झोपल्यावर पोटातील आम्ल पुन्हा अन्ननलिकेत येऊ शकत नाही. त्रिकोणी आकारातील उशांचा वापर यासाठी करु शकतो. वैद्यकीय साहित्याच्या दुकानात या उशा मिळू शकतात.

योग्य आहार

एकदम जास्त आहार घेऊ नका. थोडा थोडा वेळाने अन्न सेवन करा. दिवसातून ३ वेळा व्यवस्थित जेवावे. तसेच जेवताना सावकाश आणि प्रत्येक घास चावून खावा.

अतिचरबीयुक्त पदार्थ खाल्यास अपचनाची स्थिती अधिक गंभीर होऊ शकते. शिवाय अति कॅफिन असणारी पेये जसे कॉफी, चहा आणि कोला यांचे अतिसेवन टाळावे.

रात्रीच्या वेळी अपचन होण्याची व्यक्तीची प्रवृत्ती असेल तर त्यांनी झोपण्याआधी ३-४ तास काहीही खाणे टाळावे. कारण भरपेट जेवून झोपल्यास पचनाचे आम्ल घशाशी येण्याचे प्रमाण अधिक असते.

नैसर्गिक उपाय

अपचनासाठी काही नैसर्गिक उपाय जरुर करता येतात. आले हे पारंपरिक घरगुती औषधापैकी एक आहे जे अपचनासाठी वापरले. आल्याचा गुण येतो. संशोधनानुसार जेवणाआधी आल्याचा एक तुकडा चघळल्यास पोट रिकामे राहात नाही. अपचन होण्यास रिकामे पोटही कारण असल्याचे समोर आले आहे. ज्या व्यक्तींना अपचनाची समस्या आहे त्यांनी जेवणाआधी आल्याचा चहा घेऊन पहावा. त्याचा फायदा अपचन कमी करण्यास होऊ शकेल.

बडिशेप

बडीशेपेत व्होलाटाईल तेलात अ‍ॅनेथॉल नावाचा घटक असतो ज्याचा फायदा होतो. त्यामुळे स्नायूंना आलेली सूज कमी होते. त्यामुळे घशाशी येणे आणि पोटातील गॅस्ट्रोइन्टेन्स्टायनल ट्रॅक्ट मध्ये पिळवटल्यासारख्या वेदना होतात त्या कमी होण्यास मदत होते. बडिशेपेचा वापर पारंपरिक पद्धतीने मुखवास म्हणून केला जातो तसेच काळ्या जिऱ्याचाही वापर केला जातो. कारमिनिटीव्हस नावाने ओळखल्या जाणाऱ्या औषधींचा हा समूह आहे. या समूहातील औषधी या अपचन आणि जळजळ, अस्वस्थता दूर करण्यासाठी वापरल्या जातात. काळ्या जिऱ्याचा चहा दिवसातून तीनदा घेतल्यास अपचनामध्ये फायदा होतो.

हळद-

फोडणीच्या डब्यातील हळद ही बहुतांश पदार्थात वापरली जाते. हळदीने फक्त चव वाढते असे नाही तर पोटासाठीही हळद औषधी आहे. एका अभ्यासानुसार अपचनाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी दिवसातून चार वेळा ५०० मिलीग्रॅम हळदीचे सेवन आठवडाभर जेवणानंतर आणि झोपण्यापुर्वी केल्यास समाविष्ट लोकांपैकी ८७ टक्के लोकांना पचनसंस्थेत सुधारणा झाल्याचा अनुभव आला आहे. हळदीचे सेवन कसे करावे तर पदार्थांमध्ये हळदीचा वापर करावाच शक्य असल्यास हळदीचा चहा प्यावा.

केळ

अपचन झाल्यास केळ हे फळ अत्यंत उपयुक्त आहे. याविषयी केलेल्या अभ्यासात अपचनाचा त्रास असलेल्या ७५ टक्के सहभागी व्यक्तींंना आठ आठवडे केळ्याची पावडर दिली गेली. काहींना पूर्णपणे तर काहींना थोड्या प्रमाणात त्रास कमी झालेला जाणवला. केळ्यामुळे पोटाच्या अंतत्वचेचा थर किंवा म्युकस लायqनग वाढते आणि पोटाचे संरक्षण करते. केळ्यामध्ये फ्लॅवेनॉईडस असते जे ल्युकोसियानिदीन नावाने ओळखले जाते ते नैसर्गिक अँटासिडची निर्मिती करते. त्यामुळे सर्वसाधारणपणे पिकलेले केळे खाल्ल्यास अपचनापासून सुटका होते.

मध-

अपचनासाठी वापरले जाणारे सर्वसाधारण औषध म्हणजे मध. त्याला शास्त्रीय आधारही आहे. अभ्यासातून असे स्पष्ट झाले आहे की मनुकाच्या झाडापासून मिळणारे मध हे हेलिकोबॅक्टर पायलोरी बॅक्टेरियाच्या विरोधात काम करते. हाच जीवाणू अनेकदा अपचनास कारणीभूत ठरतो. मनुका मध चमचाभर घेतल्यास किंवा चमचाभर मधात थोडा आल्याचा रस घातल्यास आराम मिळतो.

लाल ढोबळी मिरची

अपचनामध्ये लाल ढोबळी मिरची उपयुक्त ठरते. ज्या व्यक्तींना अपचनाचा त्रास होतो पण त्यांना गॅस्ट्रो ऑसोफागल रिफ्लक्स आजार नाही किंवा बोवेल सिन्ड्रोम मध्ये जळजळ, घशाशी येणे, वेदना, नॉशिया मध्ये लाल रंगाची ढोबळी मिरचीची पावडर खाल्ल्याने ही सर्व लक्षणे कमी होतात. आहारात सलाडवर किंवा दह्यावर लाल ढोबळी मिरचीची पावडर भुरभुरावी. दह्यातील रायते हे तर भारतीय आहारात सर्वसामान्यपणे खाल्ले जातेच त्यात भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि लाल ढोबळी मिरचीची पावडर भुरभुरू शकतो.

श्वसनाचे व्यायाम

तणावग्रस्त असाल तरीही अपचन होऊ शकते. त्यासाठी श्वसनाचे व्यायाम उपयुक्त ठरतात. या व्यायामामुळे तणाव कमी होतो आणि शांतता मिळते.

श्वसनाचे व्यायाम

अगदी साधेसोपे श्वसनाचे व्यायाम करावेत. पायात थोडे अंतर ठेवून उभे रहावे किंवा बसावे. आता दीर्घ श्वास घ्यावा. पोटात श्वास जायला हवा. त्यानंतर तोंडाने हळुहळु श्वास सोडावा. हा व्यायाम तीन ते पाच मिनिटे करावा.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon